औरंगाबाद | सध्या राज्यात कोरोना पुन्हा डोक वर काढू लागला आहे. दिवसेंदिवस कोरोनारूग्णांचे आकडे वाढताना दिसत आहे. प्रशासनानेे पुन्हा खबरदारी म्हणून संचारबंदीचे आदेश देत शाळाही बंद करण्याचे आदेश दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नागरिकांना मास्कचा वापर करत वारंवार आपले हात सॅनिटाइज करण्यास सांगितले आहेत. तर दुसरीकडे याच्या उलट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे मास्क न घालण्याचं आवाहन करत आहेत.
राज ठाकरेंच्या आवाहनामुळे त्यांच्याविरोधात पोलिसात तक्रार झाली आहे. औरंगाबादच्या क्रांतीचौक पोलीस ठाण्यात राज ठाकरे यांच्याविरोधात मास्क न घालण्याच्या आवाहनामुळे राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढला, असा तर्क लावत वकील रत्नाकर चौरे यांनी तक्रार दाखल केली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या नाशिकच्या दौऱ्यावर असतानाही त्यांनी मास्क घातलं नव्हतं. त्यावेळी तर त्यांनी नाशिकचे माजी महापौर अशोक मुर्तडक यांना मास्क काढण्यास सांगितलं. तर त्याआधी मराठी भाषा दिनाच्या वेळी मनसेने मराठी स्वाक्षरी मेहिम राबवली होती. त्यावेळी शिवाजी मैदानावर पत्रकारांशी संवाद साधाताना त्यांनी मी मास्क घालत नाही, असं जाहीरपणे सांगितलं होतं. या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंना राष्ट्रवादीचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी पत्र लिहिलं आहे.
दरम्यान, राजसाहेब आपण जाणते नेते आहात. लोक तुम्हाला लोक मानतात, तुम्ही लोकांसाठी प्रेरणा आहेत पण असं वागू नका. कोरोना संसर्गाचा हा काळ सुरु असताना आपण मास्क परिधान करा, असं क्लाईड यांनी राज ठाकरे यांना पत्रात म्हटलं आहे.
थोडक्यात बातम्या-
‘पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे परदेशात जायला वेळ पण…’; शरद पवारांचं मोदींवर टीकास्त्र
मोदींचा ममता बॅनर्जींवर निशाणा म्हणाले; ‘माता, माती आणि माणूसकी…’
काय सांगता! खेकडा चक्क सिगरेट ओढतोय; ‘हा’ व्हिडीओ पाहून सारं जग झालंय थक्क
आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात नियमांना धाब्यावर बसवुन चित्रपटाचं शूटिंग; मनसेचे गंभीर आरोप
‘दिल्लीला कसं विसरु तुम्हीच सांगा’; किंग खान ‘या’ कारणामुळं झालाय भावुक
Comments are closed.