बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बारावी नापास म्हणून ‘खिल्ली’ उडालेल्या मनसे नेत्यानं जिद्धीनं पूर्ण केली पदवी!

नाशिक | राजकारण आणि शिक्षण याचा काही संबंध नसतो, असं मानलं जातं. ज्याला शिक्षणातलं काही जमलं नाही तर राजकारणात जावं, असं म्हणतात. मात्र सर्वांसमोर अपमान झाल्यावर मोठा मानसिक धक्का बसतो. अपमान हे आविष्काराचं कारण ठरतं, असं म्हटलं जातं. अशीच एक घटना नाशिकच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यासोबत घडली आहे.

नाशिकचे मनसे जिल्हाध्यक्ष आणि शिवसेनेचे माजी नगरसेवक दिलीप दातीर हे नेहमीप्रमाणे आपल्या सहकार्यासोबत बसले होते. राजकारणात प्रवेश केला त्यावेळी त्यांच्या एका राजकीय सहकार्याने त्यांचं शिक्षण विचारलं. बारावी नापास असं सांगताच त्या सहकार्याने त्यांची चार चौघात खिल्ली उडवली. त्या सहकार्याचं बोलणं त्यांच्या मनावर लागलं. त्यानंतर त्यांनी आपण अर्धवट राहिलेलं शिक्षण पुर्ण करण्याची शपथ घेतली. वय जास्त असलं तरी काँलेजमध्ये अॅडमिशन घेतलं. राजकीय कारकीर्द सुरु ठेवत असताना जिद्द व मेहनतीने पदवीपर्यंतचं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं.

शिक्षण पुर्ण करण्याची घेतलेली शपथ केल्यानंतर दिलीप दातीर भावुक झाले. जिद्धीनं आणि चिकाटीनं अभ्यास केल्यानं त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुललं. दातीर नुसतेच पास झाले नसून त्यांना फस्ट क्लास विथ डिस्टिंक्शन देखील मिळालं आहे. दिलीप दातीर यांनी राज्यशास्त्र या विषयात पदवी संपादन केली आहे. त्यांच्या या यशानंतर मनसे सैनिकांनी त्यांचं तोंडभरून कौतूक केलं आहे.

घरामध्ये सात बहिणीच्या पाठीवर एकुलता एक असल्याने व्यवसायाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यामुळे बारावीनंतरचं शिक्षण अपूर्ण राहीलं. राजकारणात प्रवेश केल्यानंतर पदवी पूर्ण करण्याचं ठरवलं. जोमाने व चिकाटीने अभ्यास केला व यशस्वी झालो. यापुढे शिक्षण सुरूच ठेवणार आहे, असं दिलीप दातीर म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

“सचिन पायलट लवकरच भाजपमध्ये येतील, माझं त्यांच्याशी बोलणं झालंय”

“…त्यावेळी मुख्यमंत्रीपद घेतलं असतं तर परिस्थिती चांगली असती”

‘नवनीत राणा यांच्यावर लोकसभा सभापतींनी कारवाई करावी’; आनंदराव अडसूळ आक्रमक

नियती काळ बनून आली, एकाच कुटुंबातील 9 जणांचा करुण अंत, मालाड दुर्घटनेनं मुंबईच्या डोळ्यात पाणी!

दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालाबाबत अत्यंत महत्वाची बातमी!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More