बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

19 वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या; कारण ठरली मामाची पोरगी

सांगली | आपल्या मामाच्या मुलीसोबत प्रेमसंबंध असल्यामुळे तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना सांगलीमध्ये घडली आहे. संबंधित मुलाची हत्या दगडाने ठेचून करण्यात आली असून त्याचं वय केवळ 19 वर्ष होतं. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भितीचं वातावरण निर्माण झालं आहे.

सांगलीमधील जत तालुक्यातील ही घटना आहे. गुरुवारी रात्री सुमारे 8 ते 10 वाजण्याच्या सुमाऱ्यास ही घटना घडली आहे. संबंधित मृत व्यक्तीचे नाव धनाजी टेंगळे आसं आहे. तर आरोपीचं नाव राजू लेंगरे असं आहे. राजूच्या मामाच्या मुलीसोबत धनाजीचे प्रेमसंबंध होते. यादरम्यान राजूच्या घरात त्याच्या आणि त्याच्या मामाच्या मुलीच्या लग्नाची चर्चा रंगू लागली. मामाच्या मुलीसोबत असलेले धनाजीचे प्रेमसंबंधांबाबत राजूला माहित होतं.

आपल्या लग्नाची चर्चा सुरु झाल्यामुळे राजूने त्याच्या मामाच्या मुलीसोबत असलेले धनाजीचे प्रेमसंबंध धनाजीला तोडण्यास सांगितलं. मात्र तरीसुद्धा धनाजीने चालू ठेवलं. गुरुवारी सायंकाळी धनाजी नेहमीप्रमाणे दूध वाटण्यासाठी दरीबडची गावात आला होता. दूध वाटून तो दररोज आठपर्यंत घरी जायचा. गुरुवारी रात्री दहा-साडेदहा वाजले तरी तो घरी परतला नाही, म्हणून घरातील वडील आणि नातेवाईकांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. यादरम्यान त्यांना दरीबडची कुलाळवाडी रस्त्यावर धनाजीचा मृतदेह आढळून आला.

दरम्यान, धनाजीच्या डोक्यात आणि तोंडावर दगडाने गंभीर वार करण्यात आले होते. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला होता. घटनास्थळी दुधाची किटली आणि चप्पल पडली होती. धनाजीवर पाळत ठेवून त्याचा पद्धतशीरपणे खून करण्यात आला असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

‘मी मरेन पण माझ्या कुत्र्याला मरू देणार नाही’; हृदयस्पर्शी व्हिडीओ व्हायरल

रेमडेसिवीर मिळत नसेल तर… खासदार अमोल कोल्हेंनी सांगितलं ‘हे’ पर्यायी औषध!

…अन् पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मानले कुंभमेळ्यातील सर्व संतांचे आभार!

चिंताजनक! 50 टक्के लोकांमध्ये आढळली कोरोनाची ‘ही’ नवी लक्षणं

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू; कोण मारणार बाजी?

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More