बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाविद्यालयीन अभ्यासक्रमात आता महाभारत, रामायणाचे धडे, शिक्षणमंत्र्यांनी केली मोठी घोषणा!

नवी दिल्ली | भारतीय समाज जीवनावर रामायण आणि महाभारताचा खुप प्रभाव आहे. पुरातन काळातील या कथांनी भारतीय समाज व्यवस्था बांधण्याचं काम केलं आहे. आजही भारतात रामायण आणी महाभारत या गोष्टींवरून वाद होताना पहायला मिळतात. यातच आता मध्य प्रदेश सरकारने रामायण आणि महाभारताबद्दल मोठी घोषणा केली आहे.

प्रभू राम हे देशातील सर्वांचं प्रेरणास्रोत आहेत. त्यांचे योगदान हे युवा पिढीला कळणे गरजेचे आहे. म्हणून रामायण आणि महाभारत या पुण्यकथांचा समावेश आम्ही अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमात आहोत, अशी घोषणा मध्य प्रदेशचे उच्च आणि तंत्रज्ञान शिक्षण मंत्री मोहन यादव यांनी केली आहे.

रामचरित्र मानस हा विषय स्वरूपात उच्च शिक्षणात शिकवला जाणार आहे. राज्यातील तरूणांना या शिक्षणाच्या माध्यमातून प्रभू रामांचं महत्त्व कळायला मदत होईल. तसेच महाभारताच्या समावेशाने तरूणांना आदर्श बनायला मदत होणार आहे, असंही मोहन यादव म्हणाले.

दरम्यान, मध्य प्रदेश सरकारने उच्च आणि तंत्रशिक्षण अभ्यासक्रमात बदल करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. रामायण, महाभारत आणि रामचरित्र मानस यांच्या समावेशाने उच्च शिक्षण घेणाऱ्या  तरुणांना भारतीय संस्कृतीची समज यायला मदत होणार आहे.

थोडक्यात बातम्या 

बीएससी नर्सिंगच्या अभ्यासक्रमात ‘हे’ मोठे बदल, आयएनसीने केली मोठी घोषणा

रणवीर-दीपिका झाले गुंठामंत्री! मुंबईमध्ये खरेदी केली तब्बल ‘इतक्या’ कोटींची जमीन

”ही’ गोष्ट करून मोदींनी दाखवून दिलं, ‘मी कोणाचा नाही, माझे कोणी नाही’”

“शेतकऱ्यांनी दिल्ली, हरियाणामध्ये आंदोलन करावं पंजाबला त्रास देऊ नये”

‘ …तर कोरोनाची लसही ठरु शकते निरुपयोगी’; WHOच्या माहितीनं जगाचं टेन्शन वाढलं!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More