बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

माणूस दिसला की टोचा लस! लसीकरणासाठी ‘या’ ठिकाणी राबवली जातेय अनोखी शक्कल

बंगळुरु | कोरोनाच्या संसर्गाचे थैमान सुरू असताना दुसरीकडे त्याला आटोक्यात आणण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. मात्र काही ठिकाणी लशीविषयी अफवा पसरवल्यानं अनेकांच्या मनात लसीकरणाविषयी भीती निर्माण झालेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांनी लसीकरण करावं यासाठी अनोख्या युक्त्या लढवल्या जात आहेत.

कर्नाटकच्या याडगिर जिल्ह्यात लसीकरणाला फारसा प्रतिसाद मिळत नसल्यामुळं आरोग्य अधिकाऱ्यांकडून अनोखी शक्कल लढवलेली पाहायला मिळत आहे. जिथे लोक दिसतील, तिथेच त्यांचं लसीकरण करायचं असा निर्णय घेतला असल्याचं जिल्ह्याच्या आरोग्य अधिकारी इंदुमती पाटील यांनी सांगितलं.

लस घेतल्यानंतर माणूस आजारी पडतो असे गैरसमज इथल्या लोकांच्या मनात असल्यामुळं येथील लोक लस टोचवून घेत नाहीत. लसीकरण केंद्रांवर कोणी येत नसल्यानं आरोग्य कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाण्यास सुरुवात केली. मात्र अनेक जण कर्मचाऱ्यांच्या तोंडावर दार लावून घेत आहेत. त्यामुळे आता जिथे लोक दिसतील, तिथेच त्यांचं लसीकरण करायचं असा निर्णय आम्ही घेतला आहे, अशा माहिती आरोग्य अधिकारी इंदुमती पाटील दिली.

दरम्यान, लसीकरणाच्या चुकीच्या अफवांमुळे लोक लसीकरणापासून लांब पळताना दिसत आहे. लसीकरणाविषयी जनजागृती करण्यासाठी अनेक ठिकाणी प्रयत्न केले जात आहेत. एवढंच काय तर कोरोना लस सुरक्षित असल्याचे देशवासीयांना पटवून देण्यासाठी अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन जाहीरपणे स्वत:ला लस टोचून घेतली.

थोडक्यात बातम्या –  

‘तारक मेहता…’मधील पोपटलाल ‘या’ रोमॅण्टिक चायनीझ चित्रपटात झळकला होता! पाहा व्हिडीओ

राज्य सरकारने केली यंदाच्या गणेशोत्सवासाठीची नियमावली जाहीर, वाचा सविस्तर!

“मराठा समाज शरद पवारांच्या गाड्यांमागे धावला त्यांनी मराठा समाजाला काय दिलं?”

“पंतप्रधान नरेंद्र मोदी 2024 मध्ये क्लीन बोल्ड होणार”

‘कोविशिल्ड’ लस घेतलेल्या भारतीयांना ‘या’ देशात जाण्यास अडचणी, पुनावाला म्हणाले….

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More