Top News जालना महाराष्ट्र

“मंत्री विजय वडेट्टीवार यांनी तात्काळ राजीनामा द्यावा”

जालना | काँग्रेस नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्यावरून मराठा समाज आक्रमक झाला आहे. वडेट्टीवारांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करत त्यांनी वडेट्टीवारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

जालनामधील एका कार्यक्रमात न्यायमूर्ती एम. जी. गायकवाड आयोगाचा अहवाल बोगस आहे असा उल्लेख केल्याचा आरोप करत घटनात्मक अधिकार नाकारून बोगस म्हणणारे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी त्वरित राजीनामा द्यावा अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आलं.

वक्तव्याचा निषेध करत मंत्री वडेट्टीवार यांनी त्वरित राजीनामा द्यावा या मागणीसाठी आज सकाळी विभागीय आयुक्त कार्यालय समोर लाक्षणिक उपोषण करण्यात आलं. यावेळी आंदोलनकर्त्यांनी वडेट्टीवारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांमागे ओबीसी समाजाची स्वतंत्रपणे जनगणना व्हावी, अशी मागणी करत जालन्यात महामोर्चा काढण्यात आला होता. या महामोर्चात अनेक ओबीसी नेते होते. या मोर्चाला मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या मध्यस्तीमुळे परवानगी देण्यात आली होती.

थोडक्यात बातम्या-

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी ठाकरे आहेत हे कर्नाटकच्या सरकारने आता विसरू नये- संजय राऊत

सेक्स करताना अतिउत्साह पडला महागात, तरूणाला गमवावा लागला आपला जीव!

हा घ्या पुरावा! कर्नाटकातल्या सीमा भागांमधील मराठी भाषेचा आणि संस्कृतीचा मुख्यमंत्र्यांनी दिला पुरावा

“धवलसिंह यांनी ज्याप्रमाणे बिबट्याची शिकार केली त्याचप्रकारे ते भाजपची शिकार करतील”

व्वा लय भारी! अर्धवट जळालेल्या बिडीच्या थोटक्यावरून पोलिसांनी लावला चोरीचा छडा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या