बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

परतीचा पाऊस झोडपणार! येत्या 24 तासात ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतल्यानंतर राज्यात आता परतीच्या पावसाला सुरूवात झाली आहे. सध्या परतीच्या पावसाने राज्यातील काही भागात पावसाने हाहाकार माजवला आहे. अशातच आता कोकण, मध्य महाराष्ट्रातील उर्वरीत भागात 24 तासात जोरदार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाने नागरिकांना दिला आहे.

येत्या 24 तासात राज्यातील काही जिल्ह्यांत मुसळधार पडणार आहे. कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, तसेच कोल्हापूर, पुणे, सातारा आणि वाशीममध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. तर शनिवारी 16 ऑक्टोंबरला वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपुर आणि गडचिरोली या भागातही पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

16 ते 17 ऑक्टोबर रोजी उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील परिसरासह वादळी वाऱ्याच्या वेगाने पाऊस पडणार आहे. विदर्भतील काही भागातही अशातच स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान,  गेल्या काही महिन्यात अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. गेल्या 24 तासात पुण्यासह, मुंबई परिसरात हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला होता. आजही नवी मुंबईसह इतर परिसरात पाऊस झाला. राज्यातील इतर भागात 24 तासात विजेच्या कडकडासह जोरदार पाऊस होणार असल्यामुळे नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचाही इशारा देण्यात आला आहे.

पाहा ट्विट

 थोडक्यात बातम्या- 

शिवसेनेच्या ‘या’ नेत्याच्या अडचणीत वाढ; ईडीकडून मोठ्या कारवाईची शक्यता

बहुप्रतिक्षित IPO बाजारात धडकणार! ‘या’ कंपनीबाबत केंद्र सरकार लवकरच मोठी घोषणा करणार

“मी बिग बॅासमध्ये गेल्यामुळे काही लोकांपर्यंत कीर्तन परंपरा पोहोचली”

वापरलेल्या मास्कची पायपुसणी, धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यावर महापालिकेची कारवाई!

“तृप्ती देसाई सुद्धा मला भिडताना विचार करुन भिडायच्या”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More