बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पैसे परत न दिल्यानं भरमंडईत महिलेची छेडछाड; महिलेनं दिला आत्मदहनाचा इशारा

बीड | गेल्या काही दिवसांपासून महिला सुरक्षिततेचा मुद्दा चर्चेत आहे. अशातच बीडमध्ये एका महिलेची भाजी मंडईत छेडछाड झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित महिला ही 38 वर्षांची असून ती भाजीविक्रीचा व्यवसाय करते. तिच्या पतीने एका व्यक्तीकडून पैसे उसने घेतले होते. मात्र परतफेड नाही केली. त्यामुळे ज्या व्यक्तीने पैसे उसने दिले होते तो व्यक्ती आता पिडीत महिलेचा छेडछाड केली आहे.

उसने पैसे दिलेल्या व्यक्तीचं नाव सीतारात प्रभू बडे असं आहे. सीतारात याने 22 जून रोजी गुंडांच्या साह्ह्याने महिलेवर दाबदडप केली. त्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे. मात्र पोलिसांनी या प्रकरणात फक्त अदखलपात्र गुन्हा नोंदवला. संबंधित महिला आपल्या पती आणि तीन मुलांसोबत राहते.

11 सप्टेंबर रोजी आरोपीने पुन्हा महिलेच्या गाड्यावर जाऊन तिची मारहाण केली. तसेच तिच्यासोबत लज्जास्पद शब्दात भाष्य केलं. यावेळी तिच्या पतीने तिला त्यांच्या तावडीतून सोडवलं. हा प्रकार 11 सप्टेंबर रोजी सुमारे साडे सात वाजता घडला. त्यानंतर महिलेने पुन्हा एकदा पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली. मात्र पुन्हा पोलिसांनी केवळ अदखलपत्र गुन्हा नोंदवल्याचा आरोप तिने केला आहे.

दरम्यान, सतत होणाऱ्या छळला कंटाळून आता विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करुन आरोपीला जेरबंद करा, अन्यथा 20 सप्टेंबर रोजी आत्मदहन करेल, असा इशारा पिडीत महिलेने दिला आहे. तसेच पोलीस माझं काहीच वाकडं करु शकत नाही. त्यामुळे तु आणि तुझा नवरा कुठेही जा तुम्हाला सोडणार नाही, अशी धमकी आरोपीने संबंधित महिलेला दिल्याचं सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

कोरोना काळात रक्ताचा मोठा तुटवडा, टाटा रुग्णालयाने केलं महत्त्वाचं आवाहन

एका दुचाकीवर डझनपेक्षा जास्त मुलांचा गोंधळ, पाहा व्हिडीओ

“बलात्कार करणाऱ्याला आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्याचा चौरंग करू”

“पाशवी बलात्काराच्या घटनेनंतरही पाठ थोपटून घेणं हे स्वाभाविक”

सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; वाचा आजचे ताजे दर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More