बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भास्करराव पेरे पाटलांना मोठा धक्का; पाटोदा ग्रामपंचायतीत सर्वात धक्कादायक निकाल

औरंगाबाद | पाटोदा गावाला राज्यभर ओळख करून देणारे विकास पुरूष भास्करराव पेरेंच्या ग्रामपंचायतीच्या निकालाने पेरेंना मोठा धक्का बसला आहे. सर्वांचं लक्ष लागून होतं. भास्कररावांच्या मुलीचा पराभव झाला आहे.

भास्कररावांनी राजकारणातून निवृत्ती जाहीर केली होती. त्यांंच्या जागी त्यांची मुलगी अनुराधा पाटील  ग्रामपंचायत निवडणुकीला उभी राहिली होती. मात्र अनुराधा पेरेंच्या विरोधात उभ्या असलेल्या उमेदवाराला 208 मते मिळाली तर अनुराधा यांना 183 मते मिळाली.

अकरा सदस्य असलेल्या पाटोद्याच्या ग्रामपंचायतीमध्ये आधीच आठ सदस्य बिनविरोध निवडून आले होते. त्यामुळे तीन जागांसाठी मतदान झालं. यापैकी एका जागेवर अनुराधा पाटील उभ्या राहिल्या होत्या.

दरम्यान, अनुराधा पाटील यांच्या पराभवाने भास्करराव पेरेंच्या गटाबद्दल असलेली नाराजी निकालातून दिसून आली आहे. या निकालावर भास्कररावर पेरे-पाटील काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या-

30 वर्षानंतर निवडणूक; पोपटराव पवारांच्या हिवरे बाजारमध्ये असा लागला निकाल!

“शरद पवारांनी धनंजय मुंडेंची पाठराखण करू नये”

ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल आज होणार जाहीर!

…म्हणून ‘या’ गावात निवडणुकीचा निकाल पाहायला गावकरीच उरले नाहीत

“…त्याच गोस्वामी टोळीनं राष्ट्रीय सुरक्षेचे धिंडवडे काढून भाजपचं तोंड काळं केलं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More