बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुलगी दिली नाही म्हणून त्याने मुलीच्या आईलाच फूस लावून पळवलं, अन्…

धुळे | प्रेमापोटी एखादी व्यक्ती कोणत्या स्तरावर जाऊ शकतात हे आपल्याला माहितीच आहे. तर एकतर्फी प्रेमाची अनेक प्रकरणे आपण दररोज वाचत असतो. धुळ्यात असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका तरूणाने मुलगी देत नाही म्हणून चक्क तिच्या आईलाच पळवून नेल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे त्यांच्या परिवारातील सर्वांना मोठा धक्का बसला आहे.

काही दिवसांपुर्वी एक तरूण मुलगी बघायला मुलीच्या घरी गेला. त्याला मुलगी आवडली परंतू तिच्या घरच्यांनी या स्थळाला नकार कळवला. हा नकार न पचल्यानं तरूणांन मुलीच्या घरच्यांना चाकूचा धाक दाखवत मुलीच्या आईलाच पळवून नेईल अशी धमकी दिली. त्यानंतर मुलीच्या घरच्यांनी त्यांला लग्नासाठी नकार दिला होता.

तरूणानं तिच्या आईशी फोनवर बोलणं चालू ठेवलं त्यानंतर तरूणानं मुलीच्या आईलाच फूस लावुन पळवून घेऊन गेला. तिचा पती घरी आल्यावर मुलीची आई त्यांना दिसली नाही. त्यांनी तिला फोन लावल्यावर मुलीच्या आईने पुन्हा घरी येण्यास नकार दिला आणि आम्ही दोघं लग्न करणार असल्याचं तिच्या पतीला तिनं सांगितलं.

दरम्यान, पळून गेलेल्या मुलीच्या आईचं वय 41 वर्ष आहे. तर तिला 5 मुलामुलींसह 4 नातवंड देखील आहेत. तिच्या लग्नाला 25 वर्ष देखील पुर्ण झाली आहेत. मुलीच्या आईने केलेल्या प्रकारामुळे तिच्या घरच्यांना मोठा धक्का बसला आहे.

थोडक्यात बातम्या- 

मी शिवसैनिक आहे, आम्ही महिलांना धमकावण्याचं काम करत नाही- अरविंद सावंत

“ए भाई , तू जो कोण असशील…”; भाई जगताप यांच्यावर अमृता फडणवीस भडकल्या

“व्वा रे बहाद्दर…महाराष्ट्र नावावर करून घेतलात की काय?”

“पोलीसांची खाती स्वत:च्या बायकोच्या बँकेत वर्ग केली तेव्हा फडणवीसांनी राजीनामा दिला होता का?”

गृहमंत्री अनिल देशमुखांवर झालेल्या आरोपांवर डॅशिंग IPS कृष्ण प्रकाश म्हणाले…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More