मुंबई इंडियन्सचा हा खेळाडू मुंबई विरुध्दच लढणार

मुंबई इंडियन्सचा हा खेळाडू मुंबई   विरुध्दच लढणार

मुंबई |भारताचा अष्टपैलू हार्दिक पंड्या क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. सध्या सुरु असलेल्या रणजी ट्राॅफी स्पर्धेत गट अ मधील बडोदा संघात त्याची निवड झाली असून, तो मुंबई विरुध्द खेळणार आहे. 

14 डिसेंबरला मुंबई विरुध्द बडोदा असा हा सामना रंगणार आहे. हार्दिकच्या निवडीबद्दल बडोदा क्रिकेट असोशियनचे प्रभारी सचिव स्नेहल पारिख यांनी हे स्पष्टीकरण दिलं. 

संयुक्त अरब अमिरातीमध्ये झालेल्या एशिया कप स्पर्धेत हार्दिकला पाठीची दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला सध्या सुरु असलेल्या भारत विरुध्द आॅस्ट्रेलिया दौऱ्यालाही मुकावं लागल आहे.

दरम्यान, 15 जणांच्या बडोदा संघात हार्दिकसह अष्टपैलू क्रिकेटर म्हणून युसूफचाही समावेश करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या 

-शक्तिकांत दास RBIचे नवे गव्हर्नर

-मोदी सरकारचा उलटा प्रवास सुरु – अरविंद केजरीवाल

-बारामती घडवायला पवार कुटुंबाला 50 वर्षे; पुरंदर-हवेली 9 वर्षात ‘त्या दिशेने’- शिवतारे

जे नको ते मतदारांनी नाकारलं; उद्धव ठाकरेंनी केलं मतदारांचं अभिनंदन

-“जीव गेला तरी चालेल, पण तुम्हाला महाराष्ट्रात आणल्याशिवाय राहणार नाही”

Google+ Linkedin