बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

प्रसिद्ध अभिनेत्रीने केली भावाची हत्या, कारण अत्यंत धक्कायदायक

बंगळुरू | आपल्याच भावाचा खून केल्याप्रकरणी प्रसिद्ध कन्नड अभिनेत्रीला धारवाड पोलिसांनी अटक केली आहे. प्रेमाला विरोध केल्याने ही हत्या केली असल्याचं प्राथमिकरित्या स्पष्ट होत आहे. या अभिनेत्रीचे नाव शनाया काटवे असं असून तिने आपला सख्खा भाऊ राकेश काटवे याचा खून केल्याचं उघड झालं आहे.

2018 मध्ये ‘इडम प्रेमम जीवनम्’ या कन्नड चित्रपटात काम करून प्रकाशझोतात आलेली कन्नड अभिनेत्री शनाया काटवे हीचे नियाज अहमद कटिगार या युवकाशी प्रेमसंबंध होते. शनायाचा भाऊ राकेश यानी या प्रेमसंबंधाला विरोध दर्शवला होता. त्यामुळे प्रेमात आडव्या येणाऱ्या स्वतःच्याच भावाला तिने आपल्या प्रियकरासोबत मिळवून संपवलं.

राकेशच्या मृतदेहाचे तुकडे हुबळी येथील गाडग रोड परिसरात आढळून आल्याने एकच खळबळ माजली. देवरगुडीहल वनपरिक्षेत्रात त्याचं डोकं आढळलं असून हुबळी येथे त्याच्या शरीराचे इतर भाग आढळून आले. त्यानंतर, धारवाड पोलिसांनी तात्काळ कारवाई करत चार संशयितांना अटक केली आहे.

पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये नियाज अहमद कटिगार, तौसिफ चन्नापुर, अल्ताफ मुल्ला आणि अमन गिरणीवाले यांचा समावेश आहे. दरम्यान, शनाया आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असताना राकेशची हुबळी येथील त्यांच्या राहत्या घरी हत्या करण्यात आली आणि त्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून ते वेगवेगळ्या ठिकाणी फेकून देण्यात आले. या प्रकरणात आता शनाया काटवेसह चार जणांवर गुन्हा दाखल झाला असून त्यांना पोलिसांनी अटकही केली आहे.

थोडक्यात बातम्या

गृह विलगीकरणात असलेल्यांनी कोरोना चाचणी करावी की नाही?; केंद्र सरकारची नवी नियमावली जाहीर

चिंताजनक! गेल्या 24 तासात देशातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीने गाठला नवा उच्चांक

खोट्या कारणाने ई-पास बनवणाऱ्यांनो सावधान; पुणे पोलिसांनी केली ‘ही’ मोठी कारवाई

कोरोना ओसरण्यास महाराष्ट्रातूनच सुरुवात होणार; तज्ज्ञांनी नोंदवलं महत्त्वाचं निरीक्षण

भारतात असणाऱ्या अमेरिकन नागरिकांना जो बायडेन यांचा अलर्ट; तात्काळ मायदेशी परतण्याच्या सूचना

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More