नवी दिल्ली | जगात जीएसटी (वस्तू आणि सेवा कर) लागू करणाऱ्या सरकारचे पराभव झाले आहेत. पण भारतात नेमकं उलटं झालं. भारतात जीएसटी लागू करणारे ‘एनडीए’ सरकार पुन्हा सत्तेत आलं आहे.
मलेशिया, कॅनडा, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या पाचही देशातील सरकारला ‘जीएसटी’मुळे पराभवाचा सामना करावा लागला होता.
ऑस्ट्रेलियात जॉन हॉवर्ड सरकारने जीएसटी लागू केल्यानंतर 1998 मधील निवडणुकीत बहुमतापासून ते खूप दूर राहिले होते. कॅनडामध्ये 1993 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान किम कॅम्पबेल यांचे सरकार जीएसटी लागू केल्यानंतर ते पराभूत झाले होते.
सिंगापूरमध्ये 1994 मध्ये जीएसटी लागू करण्यात आले होते. यामुळे तिथे वेगाने महागाई वाढली होती आणि सरकारला जनतेच्या रोषाचा सामना करावा लागला होता. पण मोदींनी जीएसटी लागू केल्यानंतर त्यांचं सरकार पुन्हा एकदा सत्तेत आलं आहे.
महत्वाच्या बातम्या
-विराट विजयानंतर नरेंद्र मोदींनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट
-भाजपनं नक्कीच मोठा ‘गेम’ खेळलाय- शत्रुघ्न सिन्हा
-मोदी समर्थकाची अनुरागच्या मुलीला बलात्काराची धमकी; अनुरागचा मोदींना सवाल
-मुहूर्त ठरला!!! या दिवशी नरेंद्र मोदी घेणार पंतप्रधानपदाची शपथ
-सामनाच्या अग्रलेखातून नरेंद्र मोदी आणि अमित शहांवर शब्दफुलांचा वर्षाव
Comments are closed.