बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिल्ली विद्यापीठाच्या आगामी दोन महाविद्यालयांना सावरकर आणि सुषमा स्वराज यांची नावं

नवी दिल्ली | उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी अनेक ठिकाणांचे नामांतर केले आहे. तसेच देशातील अनेक नामांतराच्या मुद्य़ावरून विरोधी पक्ष भाजपवर सातत्याने टीका करत आहेत. अशातच आता दिल्ली विद्यापीठाच्या आगामी विद्यालयांचं देखील नामांतर करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

शुक्रवारी दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू योगेश सिंह यांनी विद्यापीठाच्या कार्यकारणीची बैठक पार पडली. या बैठकीत दिल्ली विद्यापीठाच्या आगामी दोन महाविद्यालयांसाठी वीर सावरकर आणि भारताच्या दिवंगत माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या नावांची निवड करण्यात आली आहे.

आगामी महाविद्यालयांना दिवंगत भाजप नेत्या सुषमा स्वराज्य आणि वीर सावरकर यांचे नाव देण्याची योजना ऑगस्टमध्येच निश्चित करण्यात आली होती. विद्यापीठाने प्रस्ताव मंजूर केला आहे. आता सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे, असं माजी निवडणुक आयोगाचे सदस्य ए.के भागी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, निवड करण्यात आलेली नावे एका विशिष्ट विचारसरणीशी संबंधित लोकांची आहेत. दोनपैकी एकाही नावाचा शिक्षण क्षेत्राशी संबंध नसल्याचं आम्हाला निदर्शनास आणून दिले होते. ए.पी.जे अब्दूल कमाल यांच्यासारखी इतर नावे देऊ शकत होतो. परंतु, हे निदर्शनास आणण्यासाठी आक्षेप घेणाऱ्या काही लोकांपैकी ते एक होते, असं निवडणूक आयोगाचे सदस्य राजपाल सिंग पवार म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

शाब्बास पु्णेकर! पुण्यात आज एकाही कोरोना रुग्णाच्या मृत्युची नोंद नाही

मुंबईच्या कोरोना आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात घट, जाणून घ्या आजची आकडेवारी

मोठी बातमी! माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती आली समोर

न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघात मोठे बदल; सलामीला उतरणार ‘हा’ धमाकेदार फलंदाज

“महाविकास आघाडी ही क्रिकेट टीम प्रमाणे ‘बेस्ट ऑफ इलेव्हन’ टीम”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More