बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धोका वाढतोय! ‘या’ जिल्ह्यातील कोरोना रूग्णांच्या आकड्याने मुंबईलाही टाकलं मागे

अहमदनगर | देशभरात कोरोनाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला असताना मागच्या वर्षी टाळेबंदी घोषित करण्यात आली होती. तसेच त्यानंतर महाराष्ट्रासह देशभरातील कोरोनाचा आकडा आटोक्यात आल्याचं दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. परंतु, काही महिन्यानंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरश: थैमान घातल्याचं पाहायला मिळालं.

आता कोरोनाची दुसरी लाट ओसरली असताना डेल्टा प्लस या व्हेरिएंटचा धोका निर्माण झाला आहे. तसेच यातच आता अहमदनगर जिल्ह्यातुन एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. अहमदनगरमध्ये सक्रीय कोरोनाबाधितांची संख्या मुंबईतील सक्रीय कोरोनाबाधितांच्या संख्येपेक्षा अधिक असल्याची माहिती समोर येत आहे.

कोरोनाचं हाॅटस्पाॅट ठरलेल्या मुंबईतील कोरोना आता आटोक्यात आला असल्याचं दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. परंतु, अहमदनगरमध्ये आता कोरोनाचा धोका वाढत आहे. अहमदनगरमधील सक्रीय कोरोना रूग्णांची संख्या ही 5782 एवढी झाली असून मुंबईतील सक्रीय रुग्णांचा आकडा हा 5269 एवढा आहे.

दरम्यान, शनिवारी अहमदनगर जिल्ह्यात 1050 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून प्रशासनासह नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. अहमदनगर जिल्ह्याने सक्रीय कोरोनाबाधितांच्या आकड्यात मुंबईलाही मागे टाकलं आहे. त्यामुळे आता हा आकडा आटोक्यात येणार?, की असाच वाढत जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या –

कोलकाता पाॅर्न रॅकेट प्रकरणात आणखी एका फोटोग्राफरला अश्लील व्हिडीओ बनवण्याच्या आरोपात अटक

अखेर ‘या’ शहरात 15 ऑगस्टपासुन हेल्मेटसक्ती; हेल्मेटशिवाय पेट्रोलही मिळणार नाही

भर मंडपात नवरा सोडून भलत्यानेच केलं नवरीला किस अन्…

“आम्हाला कोणी थप्पड मारण्याची भाषा करु नये, अशी थप्पड मारू की…”

“पुरुषांच्या चुकीसाठी महिलांना दोष देणं कधी थांबवणार?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More