बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तापमान वाढल्यामुळे हिंजवडी परिसरात आग लागण्याचं प्रमाण वाढलं; स्थानिकांनी शेअर केला व्हिडिओ!

पुणे | पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असल्याने डोंगरावर वनवा पेटण्याचं प्रमाणही वाढलं आहे. हिंजवडी परिसरात असलेल्या डोंगरावर दर दुसऱ्या दिवशी दुपारच्या वेळेला तापमानात वाढ झाल्याने वाळलेलं गवत आपोआप पेट घेत असून अग्निशमन दल ही आग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे.

शनिवारी हिंजवडीतील मारूंजी भागातील एक्झर्बिया सोसायटीमधील एका बिल्डिंग समोर अशीच अचानक आग लागली आणि सोसायटीतील नागरिकांसह सिक्युरिटी गार्ड यांची एकच तारांबळ उडाली. आग विझवण्यासाठी सोसायटीतील पाईपने पाणी देऊन नागरिकांसह सुरक्षारक्षकांनी प्रयत्न केले अखेर 2-3 तासांच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणण्यात त्यांना यश आलं.

सुदैवाने या सर्व प्रकरणात कोणतीही जीवित हानी झालेली नाही किंवा कोणीही जखमी झालेलं नाही. परंतु अशाप्रकारे डोंगराला आग लागल्याने वन्यजीव नागरी वस्तीकडे वळण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. गेल्यावर्षी नेरे-दत्तवाडी, कासारसाई या भागामध्ये बिबट्याने धुमाकूळ घातला होता. परंतु नंतर त्याचा अचानक संशयास्पद मृत्यू झाला. त्यामुळे आता परत काही वन्यजीव नागरी वस्तीत घुसले तर त्याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागू शकतो.

या सर्व घटनेचा व्हिडिओ तेथील रहिवाशांनी मोबाईलमध्ये काढून सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला आहे. हिंजवडी परिसरात सारखेच वनवा पेटण्याचे प्रमाण वाढले असल्याने प्रशासनाच्या अडचणीत वाढ झाली आहे. अडगळीच्या ठिकाणी तसेच उंच डोंगरावर जिथे अग्निशमन दलाचे वाहन जाऊ शकत नाही. अशा ठिकाणी आग विझवण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. ऐन उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच जर असं चित्र असेल तर येणाऱ्या काळातील उन्हाच्या तापमानात किती वाढ होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

पाहा व्हिडिओ –

 

थोडक्यात बातम्या –  

राज्याचे गृहमंंत्री आणि मुंबईचे पोलीस आयुक्त बदलणार? जयंत पाटील म्हणाले…

लॉकडाऊनबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

तरूणाला खुलेआम प्रपोज करणं ‘तिला’ पडलं चांगलंच महागात, पाहा व्हिडिओ!

पवारसाहेब जाणते राजे, मुंबई पोलिसांची नाचक्की करणाऱ्या गृहमंत्र्यांना हटवा- प्रसाद लाड

सचिन वाझेंची प्रकृती खालावली; उपचारासाठी जे.जे. रुग्णालयात हलवलं

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More