बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पंजशीर जिंकल्याचा आनंद लहान मुलांच्या जिवावर बेतला; हवेत केला गोळीबार अन्…

नवी दिल्ली | तालिबान्यांनी अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर तेथील स्थिती भयावह झाली आहे. लवकरच तालिबान अफगाणिस्तानमध्ये आपली सरकार देखील स्थापन करण्याच्या प्रयत्नात आहेत. अशातच आता तालिबान्यांनी पंजशीर देखील ताब्यात घेतलं असल्याचं वृत्त समोर आलं आहे. मात्र तालिबान्यांच्या या आनंद सोहळ्यात लोकांना जीव गमवावा लागला आहे.

तालिबान्यांनी पंजशीर ताब्यात घेतलं असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. पंजशीर ताब्यात घेतल्यानंतर आपला उत्साह साजरा करण्यासाठी तालिबान्यांनी हवेत गोळीबार केला होता. मात्र गोळीबारात दोन लहान मुलांसह अनेकांचा बळी गेल्याची माहिती समोर येत आहे.

तालिबान्यांनी पंजशीरवर ताबा घेतल्याचा दावा रेजिस्टेंस फोर्सेसने  फेटाळला आहे. तसेच त्यांनीच उलट तालिबान्यांचं मोठं नुकसान केलं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. हवेत झालेल्या गोळीबारात अनेक लोक जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या  लोकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

दरम्यान, अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्लाह सालेह यांनी देखील देश सोडल्याचा आरोप फेटाळून लावत ही बातमी खोटी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच प्रतिकार चालू आहेत आणि चालू राहतील. मी माझ्या मातीसाठी येथे उभा आहे, असं देखील त्यांनी ट्वीट करत म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

भारताचं पदक निश्चित! प्रमोद भगतची फायनलमध्ये सुवर्णपदकासाठी लढत

चंद्रकांत पाटलांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न; तब्बल 200 कोटी हडपण्याचा रचला कट

निवडणुकीत कोणता पक्ष मारणार बाजी? ‘या’ दोन राज्यात सत्ता बदलाची शक्यता!

जितेंद्र आव्हाडांचं भिवंडीत जोरदार स्वागत, कोरोनाला चिरडून मारण्यासाठी मोठी गर्दी!

नेटकऱ्यांचा खोडसाळपणा! सिद्धार्थ शुक्लाऐवजी वाहिली ‘या’ सुपरस्टरला श्रद्धांजली

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More