भगवान बाबांच्या मूर्तीचा भाग अज्ञात समाज कंठकाने जाळला

अहमदनगर  | अज्ञात समाज कंठकाने संत भगवान बाबांच्या मूर्तीचा काही भाग जाळल्याची घटना अहमदनगरमध्ये घडली आहे. शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी पारनेर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते दसरा मेळाव्याच्या दिवशी भगवान बाबांच्या भव्य मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती.

मूर्तीचा पुढचा भाग तयार होता. मागच्या भागाच्या फिनिशिंगंच काम नगरमध्ये सुरु होतं. प्रमोद कांबळे हे काम करत असतानाच हा प्रकार घडला आहे.

अज्ञात व्यक्तीने मूर्तीचा भाग जवळील शेतात जाळला. 

दरम्यान, जागेचा मालक स्वप्निल शिंदे यानेच हे कृत्य केलं असल्याचा आरोप प्रमोद यांनी केला आहे.पारनेर पोलिसांनी स्वप्निल शिंदेंवर गुन्हा दाखल केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-आज उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार एकाच मंचावर!

-…म्हणून न्यूझीलंड दौऱ्यासाठी शुबमन गिलला मिळाली संधी

-“सवर्णांना दिलेलं आरक्षण न्यायालयात टिकणार नाही”!

-“10 टक्के आरक्षण देणाऱ्यांना झोपवल्याशिवाय राहणार नाही”

-आगामी निवडणुकांचं युद्ध जिंकायचं आहे, फेकू सरकार पाडायचं आहे- अशोक चव्हाण