बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नवरा-नवरीचे फोटो काढण्यात धुंद असलेल्या फोटोग्राफरची ‘अशी’ झाली फजिती, पाहा व्हिडीओ!

मुंबई | सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ आपल्या नजरेखालून जात असतात. त्यापैकी काही व्हिडीओ आपल्याला खिळवून ठेवतात. अशा प्रकारचे व्हिडीओ सोशल मीडियावर झटकन व्हायरल झालेले पाहायला मिळतात. हे व्हायरल व्हिडीओ लोकांचे मनोरंजन करण्याचं काम करतात. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या विषयातील व्हिडीओ हे आपल्याला व्हायरल झालेले दिसतात. अशातच सध्या एक मनोरंजक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओकडे सध्या सगळ्यांच्याच नजरा खिळल्या आहेत.

व्हायरल होणारा हा व्हिडीओ एका लग्नसमारंभाचा असून नवरा-नवरीचे फोटो काढताना फोटोग्राफर एवढा मग्न झालाय की मागे स्विमिंग पूल आहे, याचंही भान त्याला राहिलेलं नाही. फोटो काढण्याच्या नादात तो स्विमिंगपूलमध्ये पडतो. त्यामुळे फोटोग्राफरची झालेली ही फजिती कॅमेऱ्यात कैद झाली असून नवरा-नवरीच्या हावाभावांवरुन अजून हसायला आवरणार नाही.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. अशा प्रकारचे व्हिडीओ हे दररोज म्हटलं तरी आपल्याला व्हायरल झालेले पाहायला मिळतील. व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर wishnwed या अकाऊटंवरून शेअर करण्यात आला आहे.

दरम्यान, सोशल मीडियावरील काही व्हिडिओ वारंवार पाहण्याची इच्छा होते. लग्नातील असाच हा एक व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हा धडा मिळेल, की लग्न असो किंवा इतर कुठला कार्यक्रम, आपलं काम करताना नेहमी सावध राहणं गरजेचं आहे.

पाहा व्हिडीओ –

थोडक्यात बातम्या –

व्हाॅट्सअ‍ॅपचं नवं फिचर; लवकरच ‘या’ नव्या इमोजींचा होणार समावेश

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत होणार ‘या’ मास्कचा उपयोग; संशोधकांचं अनोखं तंत्रज्ञान

मुंबई लोकल सेवा लवकरच सुरू; क्युआर कोडच्या माध्यमातुन प्रवाशांना काढता येणार पास

पीओपी गणेश मुर्तींवर कडक बंदी, चुक कराल तर भराल 10 हजारांचा दंड

मंदिरं उघडण्याचा निर्णय नाहीच?; टास्क फोर्सच्या बैठकीनंतरही कोणती घोषणा नाही!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More