बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ ठिकाणावरून 318 ऑक्सिजन काॅंन्स्नट्रेटर घेऊन निघालं विमान; अवघ्या काही तासांत भारतात येणार 

नवी दिल्ली | भारतात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्यानं अमेरिकेनं भारताला मोठी मदत केली आहे. अमेरिकेनं भारताला 318 ऑक्सिजन काॅंन्स्नट्रेटर दिले असून या मशीन्स घेऊन एअर इंडियाच्या विमानानं अमेरिकेतून उड्डाण केलं आहे. अवघ्या काही तासातच या मशीन्स भारतात दाखल होणार असून त्यामुळं रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. केंद्रीय मंत्री हरदीप सिंग यांनी याबाबतचं ट्विट करून माहिती दिली आहे.

नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंग यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. प्रत्येक व्यक्तीचा अनमोल प्राण वाचवण्यासाठी आणि कोरोना संकटावर मात करण्यासाठी नागरी उड्डाण मंत्रालयाकडून करण्यात आलेला हा प्रयत्न आहे, असं सिंग यांनी सांगितलं आहे.

ऑक्सिजन काॅंन्स्नट्रेटर  ही सामान्य हवेद्वारे ऑक्सिजन तयार करणारी मशीन आहे. ही मशीन रुग्णांसाठी एक प्रकारची जीवन संजीवनीच आहे. ऑक्सिजन काॅंन्स्नट्रेटर हे गृह विलगीकरणात असलेल्यांसाठी एक चांगला पर्याय आहे. देशात बीपीएल आणि फिलिप्स या दोन कंपन्याच या मशीनचं उत्पादन करतात. हे ऑक्सिजन काॅंन्स्नट्रेटर ऑक्सिजन सिलिंडरपेक्षा खूप वेगळं असतं. मेडिकल ऑक्सिजन काॅंन्स्नट्रेटर 30 ते 60 हजार रुपयात बनवलं जातं. काही पोर्टबल मशीन खूप छोट्या असतात. त्याची किंमत 3 ते 5 हजार रुपये असते. या मशीन वीज किंवा बॅटरीवर चालतात.

दरम्यान, भारतातील कोरोनाचं संकट वाढल्याने अनेक देशांनी भारताला मदतीचा हात दिला आहे.महामारीच्या काळात जेव्हा आम्ही संकटात होतो. तेव्हा भारताने आम्हाला मदत केली. आता भारताच्या संकटावेळी आम्ही त्यांना सर्वोतोपरी सहकार्य करण्यास कटिबद्ध आहोत, असं अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन यांनी सांगितलं आहे.

 

थोडक्यात बातम्या

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुठेच दिसत नाहीत, मला तर अजित पवारच मुख्यमंत्री वाटतात”

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला निवडणूक आयोगच जबाबदार ; मद्रास उच्च न्यायालयाचा संताप

आयपीएलमधील या संघाला मोठा धक्का! या भारतीय खेळाडूने घेतला स्पर्धा सोडण्याचा निर्णय

कौतुकास्पद! युवा गोल्फपटूने कोरोना लसीकरणासाठी दिली आतापर्यंतची सर्व कमाई

इंजेक्शन-औषध मिळत नाहीत?, #MahaCovid हॅशटॅग वापरुन एक ट्विट करुन पाहा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More