मेलबर्न | ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघातील खेळाडूंनी कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन करुन हॉटेलबाहेर जेवण केल्याचा आरोप करण्यात आलाय. दरम्यान भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने हे आरोप फेटाळून लावलेत.
भारतीय क्रिकेट संघाच्या कोणत्याही खेळाडूने कोरोना संबंधीच्या नियमांचं उल्लंघन केलेलं नाही. यासंदर्भात ऑस्ट्रेलियातील काही माध्यमांनी दिलेलं वृत्त निराधार असल्याचं भारतीय संघाच्या व्यवस्थापनाकडून स्पष्ट करण्यात आलंय.
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याच्या सांगण्यानुसार, भारतीय संघाला कोरोनासंदर्भातील सर्व नियम तसंच सूचना माहिती आहेत. त्यामुळे त्यांनी कोणत्याही नियमांचे उल्लंघन केलेलं नाहीये.
मेलबर्नमध्ये भारतीय चाहत्याने खेळाडू रोहित शर्मा, ऋषभ पंत, नवदीप सैनी आणि शुभमन गिल यांचा रेस्टॉरंटमध्ये जेवण करतानाचा असतानाचा व्हिडिओ ट्विट केला होता. मात्र कोरोनाच्या नियमानुसार खेळाडूंनी हॉटेल बाहेर खाण्याची परवानगी आहे. आणि त्यासाठी आवश्यक ती काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आलेत.
थोडक्यात बातम्या-
भारत-ब्रिटन विमानसेवा 8 जानेवारीपासून होणार सुरु
“कोण रश्मी वहिनी? असं बहुतेक संजय राऊतांचं म्हणणं असावं”
“आता सत्ता महत्त्वाची की मराठी अस्मिता महत्त्वाची हे शिवसेनेने ठरवावं”
‘सरकार तीन पक्षांचं आहे शिवसेनेने विसरून नाही चालणार’; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा शिवसेनेला इशार