Top News महाराष्ट्र मुंबई

“मोदी सरकारचे धोरण नको तिथं बोलायचं आणि हवं तिथं हाताची घडी तोंडावर बोट ठेवायचं”

मुंबई | नविन कृषी कायद्या विरोधात शेतकऱ्यांचे दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करण्याचा आज 20 वा दिवस आहे. तरीही अजून केंद्र सरकारने यावर कोणताच तोडगा काढलेला नाही. त्यामुळे आता हे आंदोलन अतिशय आक्रमक झालं आहे. याच मुद्यावरुन शिवनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

मोदी सरकारचे धोरण नको तेथे बोलायचे आणि हवे तेथे ‘हाताची घडी तोंडावर बोट’ ठेवायचे असेच राहिले आहे. ज्या शेतकरी कायद्यांवरून देशातील शेतकरी वर्गात अंगार पेटला आहे त्याबाबत सरकार काहीच बोलत नाही. तसेच सरकार पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबतही सरकार काही बोलत नाही आणि भाववाढ थांबत नाही, असंच सुरू आहे. त्यामुळे तिकडे शेतकरी आंदोलनाची ‘धार’ वाढत आहे आणि इकडे इंधन दरवाढीचा मार पडत आहे. असं राऊतांनी सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

दिल्लीत शेतकरी आंदोलनाचा वणवा पेटला आहे. देशात इंधन दरवाढीचा ‘भडका’ उडाला आहे. हा ‘वणवा’ आणि ‘भडका’ वेळीच शांत करणे केंद्रातील सरकारच्याच हिताचे असल्याचं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या आहेत. त्यामुळे देशात 20 दिवसांत 15 वेळा पेट्रोल-डिझेल दरवाढ झाली आहे. सध्या पेट्रोलचे दर प्रतिलिटर नव्वदीपार गेले आहेत, तर डिझेलने 80 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.

थोडक्यात बातम्या-

“भाजप नेत्यांचं हे वर्ष सरकार कधी पडतंय याचा मुहूर्त शोधण्यातच गेलं”

‘दिल्लीतील चालू असलेल्या आंदोलनात शेतकरी नाहीत तर मग…’; चिदंबरम यांचा मोदी सरकारला सवाल

“विधान परिषदेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे चंद्रकांतदादांचा चेहरा पडलेला”

“गेल्या पाच वर्षात फडणवीसांनी ओबीसींचा कोणता प्रश्न सोडवला ते सांगावं?”

“रंगबिरंगी नक्षीकामवाल्या कापड्यांच्या पोशाखास मनाई केल्यास मला कसे मंत्रालयात येता येईल?”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या