बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राला महिन्याला 29 कोटी डोस देणार”

सातारा | महाराष्ट्रासह देशभरात लसीकरणावर भर दिला जात आहे. लसीकरणाचा चौथा टप्पा सध्या सुरू झाला आहे. यात राज्य सरकारने 1 मे पासून 18 ते 44 वयोगटासाठी लसीकरण सुरू केलं आहे. पण सध्या सर्वत्र लसीचा तुटवडा जाणवत असल्यानं लोकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. यातच आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

पुढील 6 महिने राज्यासाठी महत्वाचे आहेत. देशभरात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. जनतेने लसीकरणाला प्राधान्य देणे गरजेचे आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारतातील दोन आणि विदेशी काही लसींचे उत्पादन वाढवून 29 कोटी डोस प्रति महिना महाराष्ट्राला उपलब्ध होणार आहेत, अशी महिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. परंतू अद्याप राज्य सरकारकडून याबद्दल सांगण्यात आलं नाही.

केंद्राकडून राज्याला सर्वाधिक रेमडेसिवीर इंजेक्शन आणि 1750 टन ऑक्सिजन दिलं, याचा पुनरूच्चार देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. विरोधकांनी कितीही कोंडी केली तरी त्यांचे जनतेसाठी सकारात्मक काम सुरुच आहे. कोरोना काळातील त्यांच्या रुग्णसेवेला ईश्वराचे पाठबळ आहे, असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मयाणी मेडिकल कॉलेजात 500 बेडचे हॉस्पिटल आज सुरु आहे. त्याठिकाणी 3500 पेक्षा अधिक रुग्णांवर यशस्वी उपचार करुन कोरोना विरूध्दची लढाई समर्थपणे लढत आहे. तर म्हसवडच्या कोरोना उपचार केंद्रात 100 बेड्सच्या माध्यमातून रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार आहेत.

थोडक्यात बातम्या-

‘सत्य परेशान हो सकता है पराजित नहीं’; गुन्हा दाखल झाल्यानंतर अनिल देशमुखांची प्रतिक्रिया

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नीबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट करणं पडलं महागात

उत्तराखंडात पुन्हा ढगफुटी; घर, दुकानं पाण्याखाली गेल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची आकडेवारी दिलासादायक, पण मृतांचा आकडा वाढला

चिंता वाढली! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा शिरकाव, 10 रूग्ण बाधित

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More