बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“संसदेमध्ये महिला सदस्यांना धक्काबुक्की ही तर ‘गुजरात मॉडेल’ ची प्रतिकृती”

मुंबई | लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात बुधवारी खुप गदारोळ पाहायला मिळाला. ससंदेच्या सभागृहात पुरूष मार्शलकडून महिला सदस्यांना धक्काबुक्की करण्यात आली. यावर बोलताना, महिला सदस्यांचा अपमान झाला असुन अशा घटना लोकशाहीत अशोभनीय आहेत, असं अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

संसदेत घडलेल्या प्रकाराबाबत राष्ट्रपतींनी तसेच लोकसभा अध्यक्षांनी या घटनेबाबत चिंता व्यक्त केली आहे. परंतु त्यावर राष्ट्रपतींनी केंद्र सरकारला विचारणा केली पाहिजे. मात्र राष्ट्रपतींनी कदाचित राजकीय दबावामुळे विचारणा केली नसावी, असा आरोपही मलिक यांनी केला आहे.

ससंदेच्या सभागृहात विमा विधेयक मांडलं. त्या विधेयकाला विरोधकांनी जोरदार विरोध दर्शवला. तेव्हा ससंदेच्या वेलमध्ये उतरून शिवसेना आणि इतर खासदारांनी गदारोळ करत संताप व्यक्त केला. सभागृहात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं तेव्हा बाहेरून महिला आणि पुरूष मार्शलला बोलवण्यात आलं. मात्र काही पुरुष मार्शलने महिला सदस्यांसोबत धक्काबुक्की केल्यामुळे सभागृहाचं वातावरण चांगलंच तापलं. या कृतीचा विरोधकांनी निषेध व्यक्त केला असुन काँग्रेसतर्फे आंदोलन ही करण्यात आलं.

दरम्यान, पॅगसेस प्रकरण, शेतकरी आंदोलन, जातीनिहाय जनगणना या अशा सर्व विषयांवर केंद्र सरकारला चर्चा करायची नाही आणि विषयांवर त्यांना उत्तर देण्याचीच इच्छा नव्हती. त्यासाठी त्यांनी सभागृहाचं कामकाज स्थगित केलं, असंही मलिक यांनी म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

“राज्य सरकारच्या सर्कशीतल्या कोलांट उड्यांना जनता त्रासली आहे”

“इंग्रजांनी भारताची लूट केली, त्यांच्यावरचा राग अजूनही डोळ्यात माझ्या सलत आहे”

“घोषणाबहाद्दर विजय वडेट्टीवारांनी राजीनामा द्यावा”

‘लोकसभेवेळी दानवेंनी पैसै वाटून माझा पराभव केला’; शिवसेनेच्या बड्या खासदाराचा गंभीर आरोप

मुसळधार पावसामुळं लिफ्टमध्ये घुसलं पाणी अन्…, पाहा व्हायरल व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More