‘शरद पवारांचं कौतुक नाही करायचं तर कोणाचं करायचं?’; राऊतांचा बंडखोर आमदारांना टोला
मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत असणाऱ्या बंडखोर आमदारांना नाराजीचं कारण विचारलं असता अनेकांनी राऊताचं नाव घेतलं. पवारांचं इतकं कौतुक असेल तर त्यांच्याकडे जावं, अस शहाजी बापू पाटील एका मुलाखतीत (interview) म्हणाले होते. तर संजय राऊत फारच विरोधात बोलले, असं संजय राठोड म्हणाले. तसेच बाकी बंडखोर आमदारांनी देखील राऊतांवर टीका केली. याला राऊतांनी पत्रकार परिषदेत उत्तर दिलं.
जे भूमरे आता टीका करत आहेत मविआ (MVA) सरकारमध्ये तेच मंत्री झाल्यावर मला लोटांगण घालत होते. राठोडांवर गुन्हा दाखल झाला तरी आम्ही त्यांच्यासोबत होतो. शरद पवार हे जागतिक स्तराचे नेते आहेत. मोदी, गडकरी त्यांचा आदर करतात. त्यांचं कौतुक करतात. महाराष्ट्रातील आपल्या लोकांचं कौतुक होतं ही मोठी गोष्ट आहे. पवारांचं कौतुक नाही करायचं तर कोणाचं करायचं, असा सवाल राऊतांनी शहाजी बापू पाटील यांना विचारला.
बंडखोर आमदारांनी पहिल्या दिवशी सांगितलं की हिदुत्व अडचणीत आलंय त्यामुळे आम्ही बंड केला. राष्ट्रवादी काँग्रेस(NCP) निधी देत नव्हता असं दुसऱ्या दिवशी म्हणाले. तिसऱ्या दिवशी पक्षातील काही लोकं हस्तक्षेप करत होते म्हणून बाहेर पडलो असं सांगितलं. आता माझं नाव घेत आहेत. त्यांनी एक ठरवावं. नेमकं ते का बाहेर पडलेत. गोंधळू नका, लोकांना गोधंळात टाकू नका ,असा टोला बंडखोर आमदारांना त्यांनी लगावला.
40 लोकं शिवसेनेतून(shivsena) गेले म्हणून एक कपचाही उडालेला नाही. शिवसेना जमिनीवर आहे. येत्या आगामी निवडणूकात जनता त्यांना दाखवून देईल. जनता आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. आमचं मन साफ आहे, कुणाला काय म्हणायचं ते म्हणू द्या असंही ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
थोडक्यात बातम्या
काळीज पिळवटून टाकणारी घटना; 6 वर्षाच्या चिमुकल्याने आईच्या डोळ्यादेखत जीव सोडला
शिवसेनेला आणखी एक झटका; ‘या’ नेत्याने दिला राजीनामा
मुंबईकरांसाठी पुढील 5 दिवस महत्त्वाचे; हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा
धक्कादायक! हॉटेलमध्ये पोळी लाटताना कर्मचाऱ्याने केलं ‘हे’ कृत्य
उद्धव ठाकरेंभोवतालच्या ‘त्या’ कोंडाळ्यात कोणते नेते?, शहाजीबापू पाटलांनी यादीच सांगितली
Comments are closed.