बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

क्लार्कच्या घरावर पडला छापा, संपत्ती पाहून अधिकाऱ्यांचे डोळे झाले पांढरे!

भोपाळ | भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे भोपाळमधील फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या किशोर मीणा या क्लार्कच्या घरावर छापा मारण्यात आला. या छाप्यात जी रक्कम मिळाती ती पाहून अधिकाऱ्यांचे डोळेदेखील पांढरे झाले. या छाप्यात त्यांना 2.18 कोटी रुपये, 8 किलो सोनं आणि नोटा मोजण्याची मशीन सापडली आहे. किशोर मीणा यांच्याबाबत भ्रष्टाचाराची तक्रार आल्यामुळे सीबीआयच्या टीमने कारवाई केली.

किशोर मीणासह तीन लोकांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलं होतं. त्यानंतर पुढची कारवाई करण्यात आली. मीणा हा सुरुवातीला एफसीआयमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने या प्रकरणी एफसीआयच्या FCI डिव्हिजनल मॅनेजरसह चौघांना अटक केली आहे. यातील तीन मॅनेजरच्या लाचेची रक्कम किशोर मीणा स्वत:कडेच ठेवत असल्याचं समजत आहे.

मोठ्या अधिकाऱ्यांसोबत भ्रष्टाचार करू लागल्याने त्याला क्लार्क करण्यात आलं होतं. एफसीआयचे मॅनेजर दुसऱ्या कर्मचाऱ्यांशी हात मिळवणी करून लाच घेत असल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर सीबीआयने जाळं पसरलं त्याप्रमाणे सीबीआयने आरोपींना मंदिरात बोलावलं आणि त्यांना तिथं लाच घेताना रंगेहात पकडलं.

दरम्यान, किशोर मीणा हा छोला परिसरात राहत असून सीबीआयची कारवाई सुरू आहे. सीबीआयकडे मीणाविरोधात लाचेच्या तक्रारी आल्या होत्या. त्याच्या घरातून भ्रष्टाचाराचे पुरावेही सापडले आहेत.

थोडक्यात बातम्या- 

कोरोनामुळे आपल्या पालकांना गमावलेल्या मुलांना मोफत शिक्षणासह केंद्र सरकारच्या मोठ्या घोषणा!

आनंदाची बातमी! पुण्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे, वाचा आजची दिलासादायक आकडेवारी

संभाजीराजेंसोबतच्या भेटीत प्रकाश आंबेडकरांचं शरद पवारांबद्दल मोठं वक्तव्य

वर्षभराचा चारा जळून खाक, कृषी पदवीधर युवाशक्तीचा शेतकऱ्याला मदतीचा हात!

लस द्यायला आलं पथक, आज्जीबाईचा चढला पारा, व्हिडीओ जोरदार व्हायरल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More