बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रेल्वेने भंगार विकून केली ‘इतक्या’ कोटींची कमाई!

नवी दिल्ली | कोरोना महामारीमुळे अनेक क्षेत्रांवर परिणाम झालेला आहे. देशातील सर्वच क्षेत्रांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला होता. रेल्वेलाही मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागला. रेल्वेचं उत्पन्न घटल्याने अनेक सवलतीही बंद करण्यात आल्या होत्या. त्यातच आता रेल्वेने भंगारामध्ये काढलेल्या वस्तूंची विक्री करून मोठं उत्पन्न मिळवलं आहे. 2021 मध्ये रेल्वेला 9 कोटी 21 लाखांचा महसूल मिळाला होता.

मध्य रेल्वेने या दोन महिन्यात 57 कोटी 29 लाखांचे भंगार विकलं आहे. ज्यामध्ये डब्बे, वॅगन, लोकोमोटिव्ह स्क्रॅप या गोष्टींचा समावेश आहे. मोठ्या संख्येने गोळा केलेल्या स्क्रॅप पीएससी स्लीपरची उत्तर रेल्वेकडून विल्हेवाट लावण्यात येत आहे. रेल्वेची जमीन इतर काही कामांसाठी आणि महसूल उत्पन्नासाठी वापरता येईल या उद्देशाने विक्री केली आहे. रेल्वेच्या सदर उपक्रमाचं कौतुक देखील करण्यात येत आहे.

मध्य रेल्वेच्या सर्वच विभागातील भंगार साहित्य, कार्यशाळेतील काही साहित्य, शेड आणि विविध डेपोमधील भंगाराची विक्री करण्यात आली आहे. रेल्वे फक्त महसूलाकरिता भंगार विकत नाही तर यामुळे परिसर स्वच्छ होण्यास मदत होते. शून्य स्क्रॅप मिशनचा एक भाग म्हणून शेड, कार्यशाळा आणि अनेक डेपोंमध्ये असलेले भंगार दूर करण्यात येते. यामुळे रेल्वे स्टेशनचा परिसर स्वच्छ राहण्यास मदत होते, असं रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, गेल्यावर्षी रेल्वेच्या उत्तर विभागाने भंगार विकून 227.71 कोटी रूपयांचा महसूल मिळवला होता. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत मिळवलेल्या 92.49 कोटी रुपयांच्या उत्पन्नापेक्षा हे 146% जास्त असल्याची माहिती आहे. अशातच रेल्वेच्या झिरो स्क्रॅप उपक्रमाचं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘…म्हणून आम्ही शिवसेनेच्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवलं आहे’; संजय राऊतांनी सांगितलं कारण

Monsoon Update | मान्सून संदर्भात मोठी अपडेट समोर

‘चिरीट तोमय्या आमदार शिवसेनेला मतदान करतील, पण…’; दिपाली सय्यद यांनी सोमय्यांना डिवचलं

मोहम्मद पैगंबरांवरील टीकेमुळे इस्लामिक देश संतप्त, कुवैतचा भारताला झटका

मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी शिवसेनेकडून ‘ही’ दोन नावं ठरली

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More