बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“भाजपचे नेतेच ओबीसी आरक्षणाचे खरे मारेकरी, भाजपचं हे ढोंगी राजकारण”

मुंबई | ओबीसींचं राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलं आहे. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणुका जाहीर केल्या आहेत. ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानंतर समाज रस्त्यावर उतरून तीव्र रोष व्यक्त करत आहे. तर भाजपनेही आक्रमक पवित्रा घेत, राज्यभर आज चक्काजाम आंदोलन केलं आहे. त्या आंदोलनानंतर देखील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपवर टीकेचंं सत्र चालूच ठेवलं आहे.

OBC आरक्षणाचे मारेकरी भाजप आज ओबीसींसाठी कळवळा व्यक्त करत आहेत. भारतीय जनता पार्टीचे हे ढोंगी राजकारण जनतेच्या लक्षात येते आहे. बेशर्मीची हद्द पार करणाऱ्या बीजेपीचा खरा चेहरा लोकांच्या लक्षात आलाय. ओबीसी बांधव अशा ढोंगी राजकारण्यांपासुन सावध आहेत, अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला खुलं आवाहन दिलं होतं. 4 महिन्यात आरक्षण दिलं नाही तर राजकारणातून संन्यास घेईल असं त्यांनी म्हटलं होतं. यावर देखील मिटकरी यांनी फडणवीसांची खिल्ली उडवली आहे. त्यांनी फडणवीसांची जुनी बातमी शेअर केली. वेेगळा विदर्भ होत नाही तो पर्यंत लग्न करणार नाही, असं फडणवीस म्हणाले होते. त्यावर तुमको ना भूल पायेंगे, अशी टीका देखील त्यांनी केली आहे.

दरम्यान, भाजपला मात्र सोयीने छत्रपती शाहु महाराज यांचा विसर पडलेला दिसतोय. सुडबुद्धीने वागणारी भाजपची मंडळी किती दुटप्पी आहेत हे यावरून दिसते. आंदोलन आपला हक्क आहे मात्र, सोयीचं राजकारण जास्त दिवस टिकत नसतं. भाजपचं ओबीसी आंदोलन म्हणजे, बेगाने शादी मे अब्दुल्ला दिवाना, अशी टीका त्यांनी याआधी केली होती.

थोडक्यात बातम्या-

पदोन्नती आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारमध्ये विसंवाद नाही- जयंत पाटील

“लबाड लांडगा ढोंग करतंय, ओबीसींचं नाव घेऊन मी पुन्हा येईनचं सोंग करतंय”

महाराष्ट्रात कोळीच्या दोन नवीन प्रजातींचा शोध; कोळ्याच्या प्रजातींना शहीद तुकाराम ओंबळेंचं नाव

“फडणवीस आणि फसवणूक हे समानार्थी शब्द आहेत”

आनंदाची बातमी! मुंबईतील कोरोना आटोक्यात; सक्रिय रूग्णांसह नव्या बाधितांच्या संख्येत घट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More