…या कारणानं नितीन गडकरींना आली चक्कर !

संग्रहीत फोटो

अहमदनगर साखर कमी झाल्यानं चक्कर आली, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट करून सांगितलं आहे. चक्कर येण्यामागील कारण त्यामुळं स्पष्ट झालं आहे.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात राष्ट्रगीत सुरु असताना चक्कर आल्यानं नितीन गडकरी कोसळले होते, त्यांना राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी सावरलं होत.

हा प्रकार घडल्यानंतर नितीन गडकरींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, त्यांंची प्रकृती आता स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

दरम्यान, नितीन गडकरींना विशेष विमानानं नागपूरला हलविण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

-मिकाला अटक झाल्याने राखीला रडू कोसळलं; सोडवायला दुबईला जाणार

-‘आंबा’ प्रकरणात संभाजी भिडेंना दिलासा; 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर

-लाडक्या मुख्यमंत्र्यांना मोदींनी दाखवला अंगठा; पत्रातील मागणी फेटाळली

-मलबार हिलचं नाव बदलण्याची शिवसेनेची मागणी, हे नाव सुचवलं!

-लग्नानंतर प्रियांकानं नाव बदललं, पाहा काय आहे नवीन नाव…