बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचं काम आमच्याच काळातलं, फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा

मुंबई | वरळीतील बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचा उद्घाटन सोहळा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडला आहे. दरम्यान, या चाळीच्या पुनर्वसनातुन 9 हजार 394 निवासी सदनिका बांधण्यात येणार असून यामध्ये नागरिकांना जीम, शाळा व रूग्णालय इत्यादीसाठी स्वतंत्र इमारत उभारली जाणार आहे.

बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाच्या मुद्यावरून आता भाजपचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर सडकुन टीका केली आहे. बी़डीडी चाळीच्या पुनर्विकासाचं काम आमच्या काळातील असल्याचं फडणवीसांनी म्हटलं आहे. तसेच या कामाच्या निविदा काढुन वर्क ऑर्डर देऊन आम्ही भुमीपुजन केलं होतं, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

आमच्या कार्यकाळातच सुरू झालेल्या कामाला दीड वर्षांचा विलंब करून पुन्हा भुमिपुजन केलं जात आहे, असं म्हणत मराठी माणसाला हक्काचं मोठं घर देण्याचा आमचा संकल्प पुन्हा पुढे जात असल्याचा आनंद असल्याचं फडणवीसांनी ट्वीट करून म्हटलं आहे. तसेच यावरून आता पुन्हा एकदा ठाकरे सरकारविरुद्ध भाजप असा वाद रंगणार असल्याचं पाहायला मिळत आहे.

बीडीडी चाळ पुनर्विकास हा प्रकल्प आशिया खंडातील सर्वात मोठा प्रकल्प असल्याचं बोललं जात आहे. तसेच गेल्या शंभर वर्षांपासुन उभ्या असलेल्या चाळीच्या इमारती आता जिर्ण अवस्थेत आल्याने सरकारने त्यांचं पुनर्जिवन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच आता फडणवीसांनी केलेल्या दाव्यावर सरकारकडुन काय प्रत्युत्तर मिळणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या

“भारतमातेचं नाव घेऊन सत्ता मिळवणारेच भारतमातेला विकायला निघालेत”

यंदा गणेशोत्सव साजरा होणार; लालबागच्या भक्तांसाठी ‘ही’ आनंदाची बातमी

सर्वसामान्यांना मोठा धक्का! LPG सिलेंडरच्या किंमती पुन्हा वाढल्या; पाहा नवे दर

वाह! तोंडावर सात टाके, तरी देखील भारतीय बॉक्सर लढला; झुंजारपणाचं सर्वत्र कौतुक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More