पुणे | मागील काही दिवसात कोरोनाचे सर्वाधिक रूग्ण हे पुणे जिल्ह्यात होते, मात्र आता कुठे तो आकडा कमी झाला नाही तर पुण्यात म्युकरमायकोसिस आजाराचे सर्वाधिक रुग्ण असल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत म्युकरमायकोसिसचे 1 हजारहून अधिक सक्रिय रुग्ण राज्यात आहेत. यापैकी 528 सर्वाधिक रुग्ण हे पुण्यात आहेत.
सध्या पुणे जिल्ह्यात म्युकरमायकोसिस आजाराच्या 528 रुग्णांवर सरकारी, खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. म्युकरमायकोसिसमुळे आतापर्यंत 25 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण ससून रुग्णालय येथे उपचार घेत आहेत. 21 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. म्युकरमायकोसिसवर उपचारांसाठी 15 बेड्स राखीव ठेवण्याचा निर्णय पुणे महानगरपालिकेनं घेतला होता.
म्युकरमायकोसिससाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करताना या ठिकाणी असलेले ऑपरेशन थिएटर अद्ययावत देखील करण्यात आले आहेत. त्याचबरोबर तज्ज्ञ डॉक्टरांना सज्ज राहण्यास देखील सांगण्यात आलं आहे. म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर केल्या जाणाऱ्या उपचाराचा सर्व खर्च महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून करण्यात येणार आहे. या आजारात लागणाऱ्या सर्व औषधांचा खर्चही या योजनेतून दिला जाणार आहे, असं राजेश टोपेंनी सांगितलं होतं.
दरम्यान, म्युकरमायकोसिसमुळे आतापर्यंत 25 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यु झालेल्यांपैकी नगर रस्त्यावरील सह्याद्री रुग्णालयात 8, ससून रुग्णालयात 6, तर जिल्हा रुग्णालयात 4 आणि बाणेर कोविड रुग्णालयात 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
थोडक्यात बातम्या-
आमदार रोहित पवारांचा ‘झिंगाट डान्स’, कोरोना रूग्णांसोबत धरला ठेका; पाहा व्हिडीओ
ॲलोपॅथी-आयुर्वेद वाद पुन्हा पेटला?; रामदेव बाबांनी IMAला खुलं पत्र लिहुन विचारले ‘हे’ प्रश्न
लॉकडाऊनमध्ये दुकान सुरू ठेवल्याने महिला जिल्हाधिकाऱ्यांची मुजोरी, पाहा व्हिडिओ
महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात लहान मुलांना होतोय कोरोनाचा संसर्ग; तब्बल 166 मुलं कोरोनाबाधित
Comments are closed.