बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

उजनीचं पाणी पेटलं! “एक थेंबही पाणी देणार नाही, अन्याय झाला तर राजीनामा देईल”

सोलापूर | सोलापूरचे पालकमंत्री आणि इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्यावर उजनी धरणातील पाणी पळवल्याचा आरोप करण्यात आला होता. सोलापूरकरांनी आक्रमक भूमिका घेत सोलापूरच्या वाट्याचं पाणी इंदापूरला देत असल्याचा आरोप दत्तात्रय भरणे यांच्यावर केला होता. त्यानंतर या मुद्यावरून सोलापूरात मोठा संघर्ष पेटला होता. त्यानंतर आता प्रकरणात जलसंपदा मंंत्री जयंत पाटील यांना हस्तक्षेप करावा लागत आहे.

सोलापूरचं एक थेंब पाणीही घेणार नाही, मात्र इंदापूरला ही पाणी कमी पडू देणार नाही. सोलापूरकरांवर अन्याय झाला, तर आमदारकीचा राजीनामा देईन, तसेच राजकारणातून संन्याय घेईन, अशी भूमिका आमदार दत्तात्रय भरणे यांनी घेतली आहे. उजनीच्या पाणी प्रश्नाबाबत निर्माण झालेले गैरसमज दूर करण्यासाठी आज पुण्यातील सिंचन भवनात बैठक बोलावण्यात आली आहे. त्याआधी भरणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या बैठकीत वरिष्ठ सिंचन अधिकारी देखील हजर असणार आहेत.

उजनी धरणातील 5 टीएमसी पाणी हे सांडपाण्याच्या नावाखाली इंदापूरकडील प्रकल्पांना वळवलं जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे सोलापूरच्या इतर शेतकऱ्यांसह स्थानिक शेतकऱ्यांनी देखील या प्रकरणात आंदोलने केली आहेत. त्यानंतर आता हे प्रकरण जयंत पाटलांच्या पारड्यात गेल्यानं सोलापूरकरांना न्याय मिळेल अशी आशा सोलापूरकरांना आहे.

दरम्यान, सोलापूरकर आणि इंदापूरकर यांच्या उजनीच्या पाणी वाटपावरून नेहमी वाद होतात. दत्तात्रय भरणे हे इंदापूरचे आमदार असले तरी सोलापूरचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे या प्रकरणात ते सामंजस्याची भूमिका घेताना दिसत आहेत.

थोडक्यात बातम्या-

“कोरोनाच्या संकटातुन बाहेर पडण्यासाठी आता भारताकडे ‘हा’ एकच पर्याय”

देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत घट, जाणुन घ्या दिलासादायक आकडेवारी

संसदरत्न पुरस्काराने चार वेळा सन्मानित काॅंग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याची कोरोनावर मात

मुलांमधील ‘या’ लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका; बालरोग तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला

धक्कादायक! अभिनेत्री आणि तिच्या बहिणीवर बलात्कार करुन केलं ‘हे’ लज्जास्पद कृत्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More