बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…तर ‘त्या’ आमदारावर गुन्हा दाखल करावा’; संभाजी ब्रिगेडची पोलीस आयुक्तांकडे मागणी

पुणे |  राज्यात गेल्या काही महिन्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे विरोधी पक्ष यावर सातत्याने सरकारवर टीका करत आहेत. अशातच आता भाजपचे कान्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील कांबळे यांनी पुणे महानगरपालिका कार्यकारी अभियंता सुमिता शिर्के यांना शिवीगाळ केलेली कथित कॉल रेकॉर्डिंग गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याच पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडने सुनील कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे.

पुणे महानगरपालिका कार्यकारी अभियंता सुमिता शिर्के या महिलेवर फोनवरून काम करण्यासाठी दबाव टाकून शिवीगाळ करत धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर प्रसारीत झाली आहे. या प्रकरणात तथ्य आढळ्यास सुनील कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक प्रदिप कणसे यांनी पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मतराव खराडे यांच्याकडे केली आहे.

कोणत्याही महिलेवर अथवा महिला सरकारी अधिकाऱ्यावर अत्यंत खालच्या पातळीवर शिवीगाळ प्रकरणाची व्यवस्थित चौकशी झाली पाहिजे. आणि जर या काॅल रेकॉर्डिंगमध्ये काही तथ्य आढळ्यास संबंधित आमदाराला शिक्षा व्हावी, असंही प्रदिप कणसे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, गेल्या काही महिन्यात ठाणे महानगरपालिकेच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंगळे यांच्यावर फेरीवाल्याने चाकू हल्ला केला होता. त्यानंतर राज्यात या प्रकरणाबाबत संतापाची लाट उसळली होती. त्यामुळे या प्रकरणाबाबत पूढे काय घडामोडी घडणार, ते आता पहावं लागणार आहे,

थोडक्यात बातम्या- 

“महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय?, आरोग्य भरतीसाठी एजंटमार्फत 15 लाख मागितले”

भाजप-मनसे युतीचा श्रीगणेशा! ‘या’ जिल्ह्यात अखेर युतीची अधिकृत घोषणा

काँग्रेसला मोठा धक्का! माजी मुख्यमंत्र्याने ठोकला काँग्रेसला रामराम

“देशात ‘ही’ नवी पद्धत आलीये, काहीजण सुुपारी घेऊन काम करतात”

“अडसूळांना अटक होताच आजारी पडले, आता मुश्रीफांना कोणीच वाचवू शकत नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More