“तेच मूर्ख, तेच शहाणे सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते तेच ते”
मुंबई | यंदाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन अनेक मुद्यांनी गाजत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यातच आता देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीचा समाचार घेतला आहे. महाविकास आघाडीच्या कारभाराचे वर्णन देवेंद्र फडणवीसांनी कवितेच्या माध्यमातून केलं आहे.
अंधळ दळतं आणि कुत्रं पीठ खातं अशी अवस्था आहे. मविआ म्हणजेच महाविनाश आघाडी, असा घणाघात देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. सरकार नावाची यंत्रणा किती उदास झाली आहे आणि लोकांच्या प्रश्नासंदर्भात सरकारला काही देणघेणं नाही. आम्ही बोललो तर आम्ही मुंबई, महाराष्ट्र आणि मराठी माणसाचे शत्रू, आता प्रत्येकाला मुंबईचा शत्रु कोण आहे, हे लक्षात आलं आहे, अशी जोरदार टीका देवेंद्र फडणवीसांनी केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीका करताना विंदा करंदीकर आणि हिंदी कवी पी.एल बामनिया यांच्या कविता सादर केल्या आहेत.
सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते तेच ते
माकडछाप दंतमंजन, तोच चहा, तेच रंजन
तीच गाडी, तेच तराणे, तेच मूर्ख, तेच शहाणे
सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते तेच ते
खानावळीही बदलून पाहिल्या,
कारण जीभ बदलणं शक्य नव्हतं
काकूपासून ताजमहाल सगळीकडे सारखेच हाल
नरम मसाला, गरम मसाला तोच तो भाजीपाला
तीच ती खवट चटणी, तेच ते आंबट सार
सुख थोडे आणि दुःख फार
दरम्यान, कोवि़ड सेंटर घोटाळ्यावरून देवेंद्र फडणवीसांनी तोफ डागली आहे. 100 कोटींची कंत्राट ही पदाधिकाऱ्यांच्या नातेवाईकांना देण्यात आली, असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. एकही कोविड सेंटर भ्रष्टाचारातून सुटलं नाही. युएनने कौतुक केलं, न्यायालयाने कौतुक केलं. मात्र, हा भ्रष्टाचार त्यांच्यासमोर जायला हवा, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
थोडक्यात बातम्या-
“मुंबईचा विचार फक्त सोन्याची अंडे देणारी कोंबडी म्हणून केला गेला”
काही दिवस ‘या’ जिल्ह्यांत पाऊस पडण्याची शक्यता, हवामान खात्याचा गंभीर इशारा
ईडीच्या सततच्या कारवाईवर संजय राऊत म्हणतात…”मला तर भिती वाटतेय”
“दोन हात करायची वेळ आली तर शिवसैनिक कमी पडणार नाही”
मोठी बातमी! महेंद्रसिंग धोनीनं घेतला ‘हा धक्कादायक निर्णय
Comments are closed.