“लसीकरणात भारतालाच प्राधान्य, भारताला गरज असताना आम्ही लस निर्यात केली नाही”
मुंबई | भारतात कोरोनाने हौदोस घातला आहे. भारतात दररोज 4 हजारांहून अधिक कोरोना रूग्णांचा मृत्यु होत आहे. त्यामुळे भारत सरकारने लसीकरणावर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. पण भारताची लोकसंख्या जास्त असल्यानं लसीकरणाचा वेग मंदावला आहे. लस अपुऱ्या पडू लागल्या आहेत. आता भारतात लस उत्पादन करणारी कंपनी सीरम इन्स्टिट्यूटने एक पत्रक काढलं आहे. त्यात त्यांनी भारतीयांना प्राधान्य देत असल्याचं म्हटलं आहे.
भारत जगातला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. इतक्या मोठ्या लोकसंख्येचं लसीकरण दोन-तीन महिन्यांत होऊ शकत नाही. जगातील सर्व लोकसंख्येला लस पुरवण्यासाठी दोन-तीन वर्षं लागू शकतात. कोरोना ही साथ भौगोलिक आणि राजकीय सीमांपुरती मर्यादित नाही. जगातील प्रत्येक व्यक्ती या विषाणूला जागतिक पातळीवर हरवण्यासाठी सक्षम होत नाही, तोपर्यंत आपण सुरक्षित नाही, असं देखील या पत्रात म्हटलं आहे.
या वर्षाच्या अखेरीस कोवॅक्स कंपनीला आणि इतर देशांमध्ये लस देणं सुरू करणार आहोत. भारतीय जनतेला गरज असताना लसींची निर्यात केली नाही. लसीच्या आपत्कालीन वापराला सीरमला दोन महिने परवानगी मिळाली होती. तरीही सीरमने आतापर्यंत 20 कोटी डोस वितरीत केले आहेत. भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात लसीकरण मोहीम 2-3 महिन्यात संपणं शक्य नसतं, असं या पत्रात म्हटलं आहे.
दरम्यान, कोणताही निष्कर्ष काढण्याआधी काही प्रमुख गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे, असं मत कंपनीने व्यक्त केलं आहे. भारतातील कोविड लसीकरण मोहिमेसाठी जे काही शक्य असेल ते सर्व सीरम कंपनी करत राहिल, असंही त्यांनी सांगितलं आहे.
थोडक्यात बातम्या-
खरंच वाफ घेतल्याने कोरोना बरा होतो का?; जाणून घ्या वाफ घेण्याचे फायदे आणि तोटे
‘म्युकरमायकोसिस’वर उपचारांसाठी पुणे महानगरपालिकेचा मोठा निर्णय
भारतात लसींचा तुटवडा; दुसरीकडे ‘या’ देशात लोकसंख्येच्या 5 पट लसींचा साठा
महाराष्ट्रातील लॉकडाऊन वाढणार?; ठाकरे सरकारमधील ‘या’ मंत्र्यांचं सूचक वक्तव्य
प्लाझ्मा थेरपीनंतर आता रेमडेसिविरही कोरोना उपचारातून होणार हद्दपार
Comments are closed.