नवी दिल्ली | कोरोनापासून बरं होण्याचं देशातील रुग्णांचं प्रमाण हे इतर देशांच्या तुलनेत चांगलं आहे, मृत्युदरही कमी आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मन की बात या कार्यक्रमातून दिली आहे.
आता युद्ध केवळ सीमेवरच लढलं जात नाही, देशातही लढलं जातं. त्यामुळे प्रत्येकाला आपली भूमिका ठरवावी लागेल. मागील काही महिन्यांपासून देशानं एकजुटीन कोरोनाचा सामना केला. त्यामुळे अनेक शंका चुकीच्या ठरवल्या गेल्या, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
कोरोनापासून बरं होण्याचं देशातील रुग्णांचं प्रमाण हे इतर देशांच्या तुलनेत चांगलं आहे, मृत्युदरही कमी आहे. मात्र कोरोना अजूनही तितकाच घातक आहे, जितका सुरूवातीला होता. त्यामुळे काळजी घेणं हेच आपलं शस्त्र आहे, असंही नरेंद्र मोदी यांनी सांगितलंय.
दरम्यान, कोरोनाचा धोका अद्याप टळला नसल्याने आपल्याला अधिक सतर्क राहणं गरजेचं आहे. चेहऱ्यावर मास्क किंवा रुमाल लावणे, दोन फूटांचं अंतर राखणं, सातत्यानं हात धुणं, कुठेही थुंकू नये, स्वच्छतेकडे पूर्ण लक्ष देणं हेच आपले शस्त्रं आहेत जे आपल्याला कोरोनापासून वाचवू शकतात. जर तुम्हाला मास्क लावल्यामुळे अडचण वाटत असेल तर क्षणभर त्या डॉक्टरांचं आणि नर्सेस आणि करोना योद्ध्यांचं स्मरणं करा, असा सल्ला मोदींनी देशवासियांना दिलाय.
महत्वाच्या बातम्या-
“उद्धव ठाकरेजी…खुदा होऊ नका, लोक उपासमारीनं मरतील”
मराठा आरक्षणासाठी सरकारची वेगाने पावले, मंत्रीमंडळ उपसमितीसोबत मुख्यमंत्र्यांची चर्चा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त २५ रुग्णवाहिकांचे लोकार्पण
“रोज संध्याकाळी 7 वाजता 5 वेळा हनुमान चालीसा म्हणा, देशातला कोरोना संपेल”
Comments are closed.