बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शाहरुखच्या मुलाआधी ‘या’ दिग्गज अभिनेत्याच्या मुलाला ड्रग्जप्रकरणी झाली होती अटक

मुंबई | बाॅलिवूडमधील दिग्गज कलाकार शाहरुख खानच्या मुलाला ड्रग्स प्रकरणी एनसीबीनं अटक केली आहे. शनिवारी रात्री मुंबई समुद्रातील एका क्रूझवर छापा टाकत तेथील अनेकांना अटक करण्यात आली. यावेळी शाहरुखच्या मुलाला देखील ताब्यात घेण्यात आलं. दिग्गज कलाकाराच्या मुलाला ड्रग्स प्रकरणी ताब्यात घेण्याची ही काही पहिली घटना नाही तर यापुर्वी एका प्रसिद्ध कलाकाराच्या मुलालाही अशाचप्रकारे अटक करण्यात आली होती.

प्रसिद्ध अभिनेता जॅकी चॅनचा मुलगा जेसी चॅनला 2014 साली ड्रग्ज सेवन केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. या कारवाई दरम्यान 100 ग्रॅम मारियुआना जप्त करण्यात आला होता. यानंतर जॅकी यांच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला असून ते चित्रपटांमध्ये कमी दिसू लागले. यामुळे त्याला 6 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षादेखील सुनावण्यात आली होती.

मुलाला अटक झाल्यानंतर जॅकीने त्याच्या प्रतिष्ठेचा कोणताच वापर केला नाही. एवढंच नाही तर मुलाची शिक्षा कमी व्हावी यासाठी देखील जॅकीने कोणताही प्रयत्न केला नाही. 9 जानेवारी 2015 रोजी जेसीची सुनावणी होती. यावेळी त्याला 6 महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र आधीच 5 महिने तुरुंगात असल्यामुळे 15 फेब्रुवारी 2015 रोजी त्याला तुरुंगातून बाहेर सोडण्यात आलं होतं.

दरम्यान, मुलगा तुरुंगातून बाहेर येताच जॅकीने पत्रकार परिषद घेऊन सगळ्यांची माफी मागितली. तसेच एका पुरस्कार सोहळ्यात त्याने त्याची प्राॅपर्टी त्याच्या मृत्यूनंतर एका चॅरीटीला दान करण्याचा निर्णय घेतला. यावरुन बाप-लेकामधील दुरावा अद्याप मिटला नसल्याचं दिसून आलं. एवढंच नाही तर आपल्या मुलामध्ये क्षमता असेल तर त्याने त्याच्या हिंमतीवर पैसा कमवावा, असं जॅक म्हणाला होता.

थोडक्यात बातम्या-.

खनिज तेलाची गेल्या 7 वर्षातील उच्चांकी, भारतातील पेट्रोल आणि डिझेलवर मोठा परिणाम

दिलासादायक! देशातील नव्या कोरोना रूग्णसंख्येत 209 दिवसातील निच्चांकी नोंद

…म्हणून जगभरातील फेसबुक सर्व्हर झालं होतं ठप्प; तब्बल एवढ्या हजार कोटींचं नुकसान

“त्याच्या मुलाच्या अटकेवर थोडीतरी सहानुभूती दाखवा”

आता विदर्भातील ‘या’ शहरात होणार नवं विमानतळ; पुढच्याच वर्षी होणार प्रवासी वाहतूक

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More