बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! ‘या’ कारणामुळे राज ठाकरेंच्या कार्यक्रमातील स्टेज कोसळला

मुंबई | राज्यात आगामी महानगरपालिका निवडणुकांची सर्वंच राजकीय पक्षांकडून तयारी करण्यात येत आहे. मनसेनंही महापालिका निवडणुकांची जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यक्रमामध्ये स्टेज कोसळल्याची घटना घडली आहे.  ही घटना मुंबईतील गोरेगाव परिसरात घडली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित होते.

सदर कार्यक्रमासाठी जो स्टेज बांधण्यात आला होता त्याची क्षमता कमी लोकांची  होती. या स्टेजवर क्षमतेपेक्षा अधिक लोक गेल्याने हा कोसळला असल्याची चर्चा आहे. या स्टेजचा मधील भाग अचानक खचला गेल्याने काही महिला कोसळल्या. मनसे कार्यकर्त्यांनी लगेच महिलांना बाहेर काढले.

स्टेज कोसळल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जनतेला शांत राहण्याचं आवाहन केलं. त्यानंतर येथील जनतेला राज ठाकरे यांनी संबोधित देखील केलं. राज ठाकरे यांना त्यांच्या सुरक्षारक्षकांनी सावरलं. स्टेजच्या पुढे जात राज ठाकरे यांनी कार्यक्रम सुरूचं ठेवला. यावेळी राज ठाकरे यांनी तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या.

दरम्यान, महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूूमीवर मनसेच्या विविध शाखांचं उद्घाटन करण्यात येत आहे. पवईतील चांदिवली येथे राज ठाकरे यांनी मनसेच्या शाखेचं उद्घाटन केलं. सुदैवाने या घटनेमध्ये कोणालाही दुखापत झाली नाही. या कार्यक्रमावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

पाहा ट्विट-  

थोडक्यात बातम्या- 

Kirit Somaiya: “उद्धव ठाकरे हिंमत असेल तर मला अटक करा”

Unlockविषयी अजित पवारांनी दिले महत्त्वाचे संकेत, म्हणाले…

आता मिळणार बिनव्याजी कर्ज, मोदी सरकारने आणली ‘ही’ भन्नाट योजना

“त्याच्यातला कलावंत उमगला”, नितेश राणेंच्या ‘म्याँव-म्याँव’वर नारायण राणेंची प्रतिक्रिया

दोघांच्या संमतीनं केलेलं सेक्स बलात्कार ठरु शकतो का?; न्यायालयानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More