बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सत्ता स्थापनेच्या कार्यक्रमात तालिबाननं दिलं ‘या’ सहा देशांना निमंत्रण, भारताच्या कट्टर शत्रूराष्ट्रांचा समावेश!

नवी दिल्ली | अमेरिकन सैन्य माघारी फिरवल्यानंतर अफगाणिस्थानमधील परिस्थिती बदलत चालली आहे. तालिबानने अफगाणिस्तानमध्ये वर्चस्व प्रस्थापित केलं. तर आज पंजशीरचाही ताबा तालिबानने घेतला आहे. त्यानंतर तालिबानी अफगाणिस्तानात सत्तास्थापनेच्या प्रयत्नात आहेत. त्यातच आता मोठी माहिती समोर येत आहे.

तालिबानने संपुर्ण अफगाणिस्थानात ताबा मिळवल्यावर सत्तास्थापनेसाठी त्यांच्या मित्र देशांना आमंत्रण दिल्याची माहिती समोर आली आहे. या मित्र देशांमध्ये फक्त तालिबानला समर्थक असणाऱ्या देशांनांच बोलवण्यात आलं आहे. त्यामुळे या यादीत सहा देशांना स्थान देण्यात आलं आहे. यात चीन, रशिया, पाकिस्तान, ईराण, कतार आणि तुर्की या देशांचा समावेश आहे. मात्र, या यादीत भारताला स्थान देण्यात आलं नाही.

तालिबान प्रामुख्य सातत्याने चीनचे गोडवे गात आहे. कारण चीनने सुरूवातीपासूनच तालिबानचे समर्थन केलं होतं. तसेच चीनने अफगाणिस्थानला आर्थिक मदत  केली होती. यामुळे तालिबानचा प्रवक्ता जबीउल्लाह मुजाहिद याने चीन जगाची आर्थिक महाशक्ती असून चीन आमच्यासाठी खुप महत्त्वाचा देश आहे, असं म्हटलं होतं.

काबूल येथील येथे राष्ट्रपती भवनामध्ये तालिबनची सत्ता स्थापनेची चर्चा अंतिम टप्यात आहे. मुल्ला बरादर याला तालिबान सरकारचा प्रमुख म्हणून घोषित केले जाऊ शकतं. त्याचबरोबर मुल्ला हिप्तुल्ला अखुंददाजाला सरकारचा सुप्रिम लीडर म्हणून घोषित करु शकतात.

थोडक्यात बातम्या-

“मुंडेने कितीही स्वतःला वाचवायचा प्रयत्न केला तरी नियती त्याला सोडणार नाही”

‘… त्यांना लाज कशी वाटत नाही’; बेळगाव महापालिकेच्या निकालानंतर राऊत भडकले

14 वर्षीय मुलीवर 8 जणांकडून सामूहिक बलात्कार, पुण्यातील घटनेनं खळबळ!

पुणे तिथे काय उणे! पुण्यात साडी फक्त नेसत नाहीत तर खातातही, नक्की काय ते जाणून घ्या

मुंबई पोलिसांसोबत झालेल्या बैठकीनंतर लालबागमधील गणेश मंडळांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More