बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तालिबान्यांची ISIS विरोधात मोहीम! अफगाणिस्तानमधून इस्लामिक स्टेटची हकालपट्टी करणार

काबूल | अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी सत्ता प्रस्थापित केल्यानंतर त्या ठिकाणी अस्थिरतेचं वातावरण निर्माण झालं आहे. तालिबान्यांनी हंगामी सरकार स्थापन केल्यानंतरही अफगाणिस्तानमध्ये दहशतवादी कारवाया सुरूच आहेत. अलिकडेच इस्लामिक स्टेटशी संबंधित गटांनी तालिबान्यांवर हल्ला केला होता. त्यामध्ये अनेकजण मृत्युमुखी पडले होते. त्यामुळे अफगाणिस्तानमधून इस्लामिक स्टेटचं समूळ संपवण्यासाठी तालिबानने एक मोहिम सुरू केली आहे.

अफगाणिस्तानमधून इस्लामिक स्टेटचं समूळ नष्ट करण्यासाठी तालिबान एक मोठी योजना आखत आहे. काबूलच्या परिसरात आणि पूर्वेकडे पाकिस्तानच्या सीमेजवळील नांगरहार प्रांतात इस्लामिक स्टेटविरोधात ही कारवाई केली जाणार असल्याची बातमी समोर येत आहे. यासंबंधित रशियाच्या स्पुटनिक या माध्यामांनी माहिती दिली आहे.

नांगरहार प्रांताची राजधानी जलालाबादेत गेल्या तीन आठवड्यापासून गोळीबार सुरू आहे. इस्लामिक स्टेटच्या स्थानिक गटांना पहिल्यांदाच याठिकाणी लक्ष्य केलं जाणार आहे. त्यामुळे तालिबान्यांच्या या घडामोडीकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे. त्याअगोदर इस्लामिक स्टेटने तालिबान्यांच्या वाहनांवर भुसुरूंगाच्या सहाय्याने हल्ला केला होता. त्यामध्ये तालिबानचे 3 जण मारले गेले होते.

दरम्यान, अमेरिकन सैनिक 30 ऑगस्टला अफगाणिस्तानातून मायदेशी परतल्यानंतर तालिबाननं अफगाणिस्तानवर ताबा मिळवला. त्यानंतर इस्लामिक स्टेट-खोरसान या संघटनेने काबूल विमानतळावर एक भीषण आत्माघातकी बाॅम्बस्फोट घडवून आणला होता. त्यात जवळपास 200 जण ठार झाले होते.

थोडक्यात बातम्या- 

महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर! अहमदनगरचा वैभव दिघे राज्यात प्रथम

एक दोन नव्हे तर 3 वेळा MPSC पास केली, पण मोनिका म्हणते, ‘जिल्हाधिकारी होयचंय’!

“तेव्हा अजित दादा आणि अशोक चव्हाणांनी राजीनामा दिला होता, तर आता…”

“चित्रा वाघ यांना ‘मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर’ची लक्षणं”

पुणे कोरोनामुक्तीच्या वाटेवर, वाचा आजची ताजी आकडेवारी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More