बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“भारताने 20 वर्ष शत्रूला मदत केली त्यामुळे…”; अडकलेल्या भारतीयांबाबत तालिबानचं मोठं वक्तव्य!

काबूल | अमेरिकेने जवळपास 20 वर्षानंतर अफगाणिस्तान सोडल्यानंतर तालिबानने हवेत गोळीबार करत आनंद साजरा केला. तालिबानचे  पूढचं लक्ष्य आता अफगाणिस्तानमध्ये नवीन सरकार स्थापन करण्याचं आहे. त्यासाठी तालिबान अनेक चर्चा आणि बैठका घेत आहे. तालिबान आणि भारत यांच्या संबंधाबाबतीत अनेक तर्क वितर्क लावले जात आहे.  याच पार्श्वभूमीवर तालिबानचे नेते अनस हक्कानी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

काश्मीर प्रश्नासंदर्भात तालिबानने भूमिका स्पष्ट केली आहे. काश्मीरचा मुद्दा आमच्या अधिकार क्षेत्रात येत नाही. त्या संदर्भात आमचा कसलाही हस्तक्षेप राहणार नाही. मात्र अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांची काळजी करायची काहीच गरज नाही आहे. ते सर्व जण अफगाणिस्तानमध्ये सुरक्षित असल्याची खात्री करून देतो, असं हक्कानी म्हणाले.

भारताने जवळपास 20 वर्ष शत्रुला मदत केली आहे. परंतु आम्ही हे सर्व विसरून आम्हाला भारतासोबत चांगले संबंध प्रस्थापित करायचे आहेत. अफगाणिस्तानमधील प्रकल्पबाबतचे धोरण आम्ही लवकरात लवकर जाहीर करू, असंही हक्कानी यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर भारताने हवाई दलातील विमानाच्या मदतीने अनेक नागरिकांना भारतात सुखरूप आणलं आहे. अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी इतर देशांनीही मोहिमा हाती घेतल्या आहेत.

थोडक्यात बातम्या-

यूपीएवेळी ‘महंगाई डायन’ वाटणाऱ्या भाजपला आता जीवघेणी महागाई ‘डार्लिंग’ वाटत आहे”

“गॅसच्या दरात भाववाढ केल्याबद्दल महागाई सम्राट मोदीजींचे मन:पुर्वक आभार”

‘…तर नरेंद्र मोदींच्या पाया पडायलाही तयार’; ठाकरे सरकारमधील ‘या’ बड्या मंत्र्याचं वक्तव्य!

तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने खाजगी रूग्णालयांना दिल्या ‘या’ महत्वाच्या सूचना

“शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी छगन भुजबळांच्या संपत्तीची माहिती द्यावी”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More