बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तालिबाननं बरोबरच केलं, आपला देश स्वतंत्र केला- शायर मुनव्वर राणा

नवी दिल्ली | तालिबाननं टप्प्याटप्प्यानं अफगाणिस्तानची राजधानी काबूलच्या प्रदेशांवर आपला कब्जा मिळवला. आता अफगाणिस्तानवर तालिबानचा ताबा आहे. सध्या यावर सगळ्या जगभरातून प्रतिक्रिया उमटत आहे. अशातच आता भारतातील ऊर्दू शायर मुनव्वर राणा यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याचं पाहायला मिळतंय.

मुनव्वर राणा यांनी नवभारत टाईम्सला दिलेल्या विशेष मुलाखतीत तालिबानच्या दशतवादी नेटवर्कबद्दल बोलताना म्हटलं की, तालिबाननं बरोबरच केलं. आपल्या जमीनीवर कशाही प्रकारे कब्जा केला जाऊ शकतो. ज्या देशाशी आपले अनेक कालावधीपासून संबंध राहिले असतील किंवा कधी तो भारताचाच भाग होता. तालिबानचं जे वागणं आहे त्याला दहशतवादी म्हणू शकत नाही, त्यांना तुम्ही अग्रेसिव्ह म्हणू शकता.

पुढे मुनव्वर राणा यांनी म्हटलं की, तुम्ही उघडपणे म्हणता की प्रत्येक मुसलमान हा दहशतवादी नसतो परंतु प्रत्येक दहशतवादी हा मुसलमान असतो. दहशतवाद्यांची व्याख्या इथं करण्यातच आली नाही, की कोण दहशतवादी आहे आणि कोण दहशतवादी नाही.

दरम्यान, तालिबाननं अफगाणिस्तानच्या बहुतांश भागावर ताबा मिळवलेला असतानाच देशाच्या पूर्व भागात नागरिकांनी बुधवारी दर्शवलेला विरोध या दहशतवादी संघटनेनं हिंसकरीत्या मोडून काढला. यात एकजण ठार, तर सहा जण जखमी झाले.

थोडक्यात बातम्या – 

पुरुष पळाले पण देशासाठी एकच महिला लढत होती, अखेर सलीमाला तालिबान्यांकडून अटक

मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नागरिकांना दिला ‘हा’ इशारा

बीडीडी चाळकरांना ठाकरे सरकारनं दिलं आणखी एक मोठं गिफ्ट!

राज्यात सर्वदूर पाऊस?, हवामान खात्याचा अत्यंत महत्त्वाचा इशारा

अफगानिस्तानच्या पळपुट्या राष्ट्रपतींचा छडा लागला, कुटुंबासह लपलेत इथं!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More