बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आईच्या डोळ्यातल्या पाण्यानं चोरालाही फुटला पाझर, चोरलेलं बाळ परत आणून दिलं

जयपूर | राजस्थान येथील बाडमेर जिल्ह्यात एक ह्रदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. येथील एका रूग्णालयातून ३ दिवसांचं बाळ चोरी झालं होतं. यानंतर बाळाच्या आईने तीन दिवस आण्णाचा एकही कण खाल्ला नव्हता. अखेर या बाळाचा शोध लागला आहे.

बारमेरमधल्या अलसुबह जिल्हा रुग्णालयातून शुक्रवारी सकाळी लहान मूल चोरीला गेल्याची घटना घडली. बाळाचे वडील पहाटे 5 वाजता वॉर्डमध्ये गेले तर तेथे बाळ नसल्याचं अढळून आलं. याबाबत माहिती देऊन देखील रुग्णालय प्रशासनाकडून योग्य तो प्रतिसाद न मिळाल्याने त्याने पोलिसात तक्रार केली. धक्कादायक बाब म्हणजे रुग्णालयात लावलेले सर्व सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत होते. शिवाय सुरक्षा गार्डदेखील ड्यूटीवर नव्हता.

रुग्णालयातून चोरी केलेल्या बाळाचा पोलिसांकडून शोध सुरू होता. अचानक बाडमेर पोलीस चौकीपासून तब्बल 100 मीटर अंतरावर एका पायी चालणाऱ्या व्यक्तीची नजर बाळाला ठेवलेल्या बॅगेवर पडली. त्याने रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांना याची सूचना दिली. ज्यानंतर बाळाला रुग्णालयात आणण्यात आलं.

या प्रकरणात तपास सुरू आहे. पोलीस पुढे म्हणाले की, कोणी ओळखीच्या व्यक्तीने बाळाचं अपहरण केल्याची शक्यता आहे. आईची अवस्था पाहून त्याला दया आली व त्यांनी बाळाला परत केलं अशी शक्यता आहे. या प्रकरणात रुग्णालयाच्या नर्सविरोधात कारवाई करण्यात आली असून ड्यूटीवर असलेल्या नर्सला निलंबित करण्यात आलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“मी इतकी व्यस्त आहे की मला बोअर व्हायलाही वेळ मिळत नाही”

“दुबळयास घाबरतं ते सरकार वृत्तीने हुकूमशाही, पण मनाने दुर्बलच असतं”

आमच्याकडेही अनेक भास्कर जाधव आहेत- बाळासाहेब थोरात

“देश उलथवून टाकण्याच्या कटात हा म्हातारा म्हणे सामील होता”

मंगलकार्यालयात बॉयफ्रेंडचं लग्न सुरु, बाबू- बाबू म्हणत गर्लफ्रेंडचा गेटवर आक्रोश

 

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More