बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तिसरी लाट भंयकर काळजी घ्या, सरकार तुमच्यासोबत- नितीन राऊत

नागपूर | कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत अनेक लोकांचं जीवन उद्धवस्त झालं. अशातच आता कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचं सांगितलं जात आहे. यावर राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी महत्वाचं वक्तव्य केलं आहे. ते नागपुर येथील ध्वजारोहणावेळी ते बोलत होते.

कोरोनाची तिसरी लाट भयंकर असल्याचं भाकित वर्तवलं जात आहे. नागरिकांनी घाबरून न जाता, स्वत:ची व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे. या लाटेचा सामना करण्यासाठी महाविकास आघाडीतील सरकार सज्ज आहे. तसेच आम्हीही तुमच्यासोबतच आहोत, असं नितीन राऊत यांनी सांगितलं.

कोरोनाच्या संकटकाळात नागरिकांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावं लागलं होतं. त्यात अनेकांना आपल्या जवळच्या नातेवाईकांना गमवावे लागले . त्यांच्या दुखात मी सहभागी आहे. कोरोनाची लाट याच महिन्यात येणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. आमच्या सरकारने या लाटेचा सामना करण्यासाठी पुर्ण तयारी करून ठेवली आहे. तसेच ऑक्सिजनचीही तयारी अगोदरच तयार करून ठेवली आहे. त्यामुळे लोकांनी घाबरून न जाता आपली काळजी घ्यावी, असंही नितीन राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, येत्या महिन्यातील 15 दिवस सणासुदीचे असल्यानं देशातील कोरोनाची परिस्थिती भयानक होण्याची भीती आहे. त्याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यांना सावध केलं आहे. 19 ऑगस्ट ते 15 ऑक्टोंबर या दरम्यान राज्यांना कडक निर्बंध लादण्याचेही आदेश केंद्र सरकारने दिले आहेत.

थोडक्यात बातम्या-

…म्हणून पठ्ठ्यानं टी-शर्टवरवरच छापलं वॅक्सिनेशन सर्टिफिकेट, पाहा फोटो!

लाल किल्ल्यावरील नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील सर्व महत्त्वाचे मुद्दे एकाच ठिकाणी!

लसीचे दोन्ही डोस घेऊन देखील ‘इतक्या’ रुग्णांना डेल्टा प्लसची लागण!

‘…याला म्हणतात ओळख’; लस घेण्यासाठी अनोखा जुगाड, पाहा व्हिडीओ

स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी मंत्रालयासमोर शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More