बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत होणार ‘या’ मास्कचा उपयोग; संशोधकांचं अनोखं तंत्रज्ञान

नवी दिल्ली | जगभरात कोरोनानं थैमान घातलं असून सगळीकडे सध्या चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. कोरोनाची स्थिती सध्या आटोक्यात येत असली तरी तिसऱ्या संभाव्य लाटेविषयीची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोरोनाचे सगळे नियम पाळत, लसीकरण करत आपण ही लाट थोपवू शकतो.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी सामना करताना आरोग्य यंत्रणा डगमगताना दिसल्या. अनेकांना बेड न मिळाल्यानं अडचणींचा सामना करावा लागला, अनेकांना ऑक्सिजन अभावी आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे आता येेणाऱ्या तिसऱ्या संभाव्य लाटेचा सामना करण्यासाठी देश तयार आहे की नाही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. मात्र, आता तिसऱ्या संभाव्य लाटेचा सामना करण्यासाठी देशाला ब्रिटिश संशोधकांनी शोधलेले तंत्रज्ञान उपयुक्त ठरू शकणार आहे.

प्राणवायूचा पुरवठा अखंड चालू राहून रूग्णांना ऑक्सिजनच्या अडचणींना सामोर जावं लागू नये म्हणून ब्रिटिशच्या एपनिया मास्क म्हणजेच ‘कंटिन्यू पॉझिटिव्ह एअरवे प्रेशर’ (सीपीएपी) मशीनचा शोध लावला आहे. या मास्कनं गंभीर स्वरूपाच्या रुग्णांना व्हेंटिलेटरवर जाण्यापासून रोखण्यास मदत होऊ शकते. वार्विक विद्यापीठ आणि बेलफास्टचे क्वीन्स विद्यापीठ या दोन्ही संस्थांमधील संशोधकांनी या मास्कचं संशोधन केलं आहे.

दरम्यान, या मास्कचा उपयोग करणाऱ्या कोरोनाबाधितांमध्ये मृत्यूदर कमी असल्याचं संशोधनात आढळून आलंय. सीपीएपीच्या या मशीनचा श्वसनाला त्रास होणाऱ्यांना उपयोगी आहे. तसेच खूपच त्रास होत असल्याचं फुफ्फुसांमध्येही हवा भरली जाते. म्हणजेच श्वसननलिकेच्या वरचा भाग निष्क्रिय होण्यापासून वाचतो. या मास्कच्या माध्यमातून ट्यूबने शुद्ध हवा नाक आणि तोंडाजवळ पुरवली जाते. त्यामुळे आता नवीन मास्कचा देशाला कितपत फायदा होईल, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्य़ात बातम्या –

पुण्याला झिका व्हायरसचा धोका?, पुण्यातील ‘इतक्या’ गावांना संभाव्य धोक्याचा इशारा

आनंदाची बातमी! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

पाकिस्तानच्या अर्शदला पदक मिळालं असतं तर मलाही आनंद झाला असता- नीरज चोप्रा

‘पंतप्रधान मोदींनी माझ्या लोकप्रियतेमुळेच टिकटाॅकवर बंदी आणली’

“मराठीपेेक्षा हिंदी चित्रपटांना झुकतं माप देता, कुठं आहेत शाखरूख, सलमान?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More