बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मी एक भारतीय मुस्लीम, मला शासन असलेल्या धर्माची गरज नाही”

मुंबई | अफगाणिस्तानच्या गंभीर परिस्थितीवर जगभरात चर्चा चालू आहे. तिथे होणाऱ्या प्रत्येक गोष्टींचे पडसाद जगभर उमटताना दिसत आहे. सध्या लोक अफगाणिस्तानमधून पलायन करण्याच्या प्रयत्नात आहेत. जगभरातून तालिबानी लोकांवर टीका होत आहे. अशातच भारतातील काही लोकांनी तालिबानचं कौतूक केलेलं पहायला मिळातंय. यावरुन ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी त्यांना चांगलंच झापलं आहे.

भारतातील काही मुस्लीम लोक तालिबानला पाठिंबा देताना दिसत आहे. त्यामुळे ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी त्यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. नसिरूद्दीन शाह यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं की, तालिबाननं अफगाणिस्तानवर पुन्हा ताबा मिळवणं ही संपूर्ण जगासाठी चिंतेची बाब आहे. अफगाणिस्तानवर पुन्हा तालिबाननं ताबा मिळवल्यानं काही भारतीय मुस्लीम आनंदी होत आहे हे ही सगळ्यात जास्त धोकादायक आहे.

मी एक भारतीय मुस्लीम आहे आणि जसं की मिर्झा गालिब काही शतकांपूर्वी म्हटलं होतं, माझ्या देवाशी माझं नातं अनौपचारिक आहे. मला शासन असलेल्या धर्माची गरज नाही, असंही नसिरुद्दीन शाह यांनी म्हटलं आहे. सध्या नसीरुद्दीन शाह यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

दरम्यान, अभिनेते नसिरुद्दीन शाह यांचा हा व्हिडीओ ‘द महाराष्ट्रा न्यूज’ या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया येताना दिसत आहे आणि व्हिडीओही तुफान व्हायरल होत आहे.

 

थोडक्यात बातम्या – 

‘…तर राज्यात पुन्हा लॉकडाऊन लावणार’; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा पुनरूच्चार

…म्हणून त्यांनी थेट ‘कोविन अॅप’च केलं हॅक; धक्कादायक प्रकार उघडकीस!

“तलिबानला आम्हीच मदत केली, त्यांना पाकिस्तानने मोठं केलं”

‘आ देखे जरा किसमे कितना है दम’; मनसेचं किशोरी पेडणेकरांना खुलं आव्हान!

बाॅलिवूडला मोठा धक्का! ‘बिग बाॅस’ फेम सिद्धार्थ शुक्लाचे अकाली निधन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More