बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनानंतर आता ‘निपाह’चा धोका?; राज्यात प्रथमच वटवाघूळांमध्ये आढळला निपाह व्हायरस

पुणे | कोरोनाचं संकट अजूनही टळलेलं नाही. त्यातच सध्या तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे कोरोनानंतर निपाह व्हायरसचा धोका वाढलेला दिसत आहे. 2018 च्या सुरूवातीला केरळमध्ये निपाह व्हायरसने थैमान घातलं होतं. फ्रुटस बॅट या प्रजातीचं वटवाघुळ निपाह व्हायरसचा नैसर्गिक प्रवाहक आहे. त्यामुळे जगभरात या व्हायरसमुळे थैमान पसरलं होतं. त्यानंतर आता महाराष्ट्रात प्रथमच वटवाघूळांमध्ये निपाह व्हायरस आढळला आहे.

राज्यातील वटवाघळांच्या दोन प्रजातींमध्ये निपाह व्हायरस आढळून आला आहे. राज्यातील वटवाघळांमध्ये निपाह व्हायरस आढळून येण्याची ही पहिलीच वेळ आहे. पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजीच्या तज्ज्ञांनी याबद्दलचं संशोधन केलं आहे. निपाह व्हायरस असलेल्या वटवाघळांच्या प्रजाती साताऱ्यातल्या गुफेत मार्च 2020 मध्ये आढळून आल्या आहेत. निपाह व्हायरस वटवाघूळांमधून माणसांमध्ये संक्रमित होतो.

राज्यात कधीही वटवाघळांमध्ये निपाह व्हायरस आढळून आला नव्हता अशी माहिती याबद्दलचं संशोधन करणाऱ्या पथकाच्या प्रमुख डॉ. प्रज्ञा यादव यांनी दिली आहे. यावर कोणतीही लस आणि औषध नसल्यानं हा विषाणू धोकादायक मानला जातो. कोरोनाचा रिकव्हरी रेट 90 टक्क्यांच्या पुढे आहे. पण निपाह मृत्यूदर तब्बल 65 टक्क्यांच्या पुढे आहे.

दरम्यान, वटवाघुळ किंवा त्यांच्यामधील व्हायरस लोकांसाठी त्रासदायक असतीलच असे नाही. भारतामध्ये फ्रुट बॅटस याच्याही अनेक प्रजाती आहेत. यामध्ये ऑनीटेक्टेरिस स्पोलिया, ग्रेटर इंडियन फ्लाइंग फॉक्स, हिप्पोसिडेरस लार्वाटस आणि स्कॉटोफिलस कुहली या वटवाघुळांमध्ये निपाह व्हायरस आढळतो.

थोडक्यात बातम्या-

देशात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत 91 दिवसातील निच्चांकी, रूग्णसंख्येत 11 हजारांची घट

लसीकरण केलेल्या नागरिकांसाठी बँकेत जास्त व्याजदर तर मॅकडॉनल्ड्समध्ये घसघशीत सुट

ED ची मोठी कारवाई ; अविनाश भोसलेंची पुणे आणि नागपुरातील मालमत्ता सील

“जो पक्ष जास्त जागा जिंकेल त्यांचा मुख्यमंत्री होईल,असं म्हटल्यास गैर काय?”

मनी लाॅन्ड्रिंग प्रकरणी प्रताप सरनाईक यांची मुंबई उच्च न्यायालयात याचिका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More