बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मगरीची शिकार करण्यासाठी वाघाने घेतली पाण्यात उडी अन्…, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली |  सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये कधी पशु-पक्षांचे असतात. तर कधी प्राण्यांचे व्हिडीओ असतात. काही व्हिडीओ प्रेरणा देणारे असतात. तर काही खूपच धक्कादायक असतात.

आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की, वाघ हा कोणत्याही प्राण्याची शिकार करण्याच खूप तरबेज आहे. एकदा का त्याने एखाद्या प्राण्याची शिकार करायचे ठरवले, तर तो त्या प्राण्याचा पिछा सोडत नाही. त्यामुळे बाकीचे इतर प्राणी वाघ समोर दिसला तरी, साधी त्याची येण्याची चाहूल जरी लागली तरी प्राणी आपली वाट बदलतात. अशातच सोशल मीडियावर याच संबंधी एक व्हिडीओ खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये वाघाने एका मगरीची शिकार केली आहे. सुरूवातीला वाघ झाडांमधून येत असतो. त्याला तलावातील पाण्यामध्ये एक मगर दिसते. तिला चाहूल लागायच्या आतच वाघ हळू-हळू आवाज न करता पुढे येतो. मगर बेसावद असतानाच वाघ तिच्यावर झडप घालतो. हे सगळ अचानक घडल्यामुळे मगरीला काही समजत नाही. ती आपला जीव वाचवण्यासाठी खूप प्रयत्न करते.

परंतू वाघाने आपल्या जबड्यात तिला धरलं आहे. त्यामुुळे  मगरीला त्याच्या तोंडातून आपली सुटका करून घेता नसल्याचं दिसून येत आहे. त्यानंतर वाघ त्या मगरीला आपल्या तोंडात धरून पाण्याबाहेर घेऊन जाताना व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. तसेच हा व्हिडीओ आतापर्यंत जवळजवळ 46 हजार लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर अनेकांनी या व्हिडीओला कमेंट्सही केल्या आहेत.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

महाराष्ट्रातील अनलॉकबाबत मंत्री विजय वडेट्टीवार यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

चिमुरडीच्या गळ्यात बी अडकली असतानाही डाॅक्टर्स करत राहिले कोरोना रिपोर्टची मागणी, शेवटी…..

मोठा निर्णय! राज्यातील इयत्ता 12 वीची परीक्षा अखेर रद्द, बैठकीत प्रस्ताव मंजूर

अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तरूणीवर सामूहिक बलात्कार; पुण्यातील धक्कादायक प्रकार!

“गोपीनाथ मुंडे असते तर ओबीसी आरक्षण रद्द करण्याची हिंमत झाली नसती”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More