बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

 रेल्वेगाडी 110 किमी ताशी वेगानं स्टेशन पार करून गेली; त्यानंतर लगेचच जमीन हादरली अन्…

भोपाळ | रेल्वेचा वेग जास्तीत जास्त करण्याचा तंत्रज्ञानाद्वारे प्रयत्न सुरू असतो. मात्र आपल्याकडे रेल्वे गाड्यांचा वेग खरंच मोठ्या प्रमाणात वाढला तर काय होऊ शकतं याचं उदाहरण समोर आलं आहे. बुरहानपूर येथे ताशी 110 किमी वेगानं रेल्वेगाडी रेल्वे ट्रॅकवरून गेली, मात्र तिच्या या वेगामुळं जमीन चांगलीच हादरली.  रेल्वे स्टेशनची इमारत एकाएकी हलली आणि कोसळली सुदैवानं इमारत कोसळताना कुठलीही जीवितहानी झाली नाही.

देशातली कदाचित ही पहिलीच घटना असेल की, रेल्वे वेगात येऊन गेल्यानंतर एखाद्या रेल्वे स्टेशनची इमारत कोसळली. कोसळलेली इमारत फार जुनी नव्हती. या इमारतीचं बांधकाम होऊन 14 वर्षे झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशमधील बुरहानपूर जिल्ह्यातील नेपानगर ते असीगडच्या दरम्यान असलेल्या चांदणी रेल्वे स्टेशनमध्ये बुधवारी सायंकाळी चार वाजता ही घटना घडली. पुष्पक एक्सप्रेस गाडी येऊन गेल्यानंतर ही घटना घडली. मात्र, ही गाडी तितक्याच वेगात येथून जात असते, असही सांगण्यात आलं आहे.

कंपन इतके जोरदार झाले होते की, स्टेशन अधीक्षकांच्या खोलीच्या खिडकीची अगोदर काच फुटली. नंतर बोर्ड खाली पडला आणि प्लॅटफॉर्मवर सगळं साहित्य अस्थाव्यस्त पडल्याचं दिसून आलं. घटनास्थळी तैनात असलेले एएसएम प्रदीपकुमार पवार रेल्वेला झेंडा दाखवण्यासाठी बाहेर आले. मात्र, परिस्थिती त्यांच्या लक्षात आली आणि इमारतीचा भाग कोसळताना पाहून त्यांनी तेथून लगेच पळ काढला त्यामुळे ते बचावले.

दरम्यान, या घटनेनंतर पुष्पक एक्सप्रेस 1 तास थांबवण्यात आली होती. इतर गाड्यांच्या वेळांवरही 30 मिनिटे परिणाम झाला. संध्याकाळी 6 च्या सुमारास दूर जाणाऱ्या 4 गाड्या थांबविण्यात आल्या. त्यानंतर हळूहळू प्रत्येक ट्रेन सोडण्यात आली. चांदणी रेल्वे स्थानक हे देशातील सर्वात रहदारीच्या मुंबई-दिल्ली रेल्वे ट्रॅकवर आहे. भुसावळ डीआरएम विवेककुमार गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, चांदणी स्थानकातील इमारतीच्या एका भागाचे छत कोसळले असून, ते दुरुस्त केले जाईल. पथक तपासासाठी घटनास्थळी पोहोचले आहे. सर्व गाड्या नियमित धावत आहेत, या घटनेत फारसे नुकसान झालेले नाही.

थोडक्यात बातम्या –

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मर्सिडीज कारचा भीषण अपघात, तासभर चालक गाडीत अडकून, पाहा व्हिडीओ

पुण्यात थरार! एकतर्फी प्रेमातून युवकाने केला गोळीबार

‘किस काॅन्ट्रोव्हर्सी’ला विसरुन राखी सावंत आणि मिकानं घेतली गळाभेट, म्हणाले…., पाहा व्हिडीओ

चक्क एका कोंबडीने मगरीला कसा दिला चकवा, पाहा मजेशिर व्हिडीओ

‘महाराष्ट्र झोपेत असताना हे सरकार पडणार’; चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More