बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ऑक्सिजनचा पुरवठा विस्कळीत झाल्याने 11 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू

हैदराबाद | संपूर्ण देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला असतानाच अनेक ठिकाणी उपचार घेत असलेल्या रुग्णांसोबत अपघात घडून त्यांचा नाहक बळी जात असल्याची गंभीर परिस्थिती पाहायला मिळत आहे. असाच एक धक्कादायक प्रकार आंध्रप्रदेशात घडला आहे.

आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यामध्ये रुईया रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत असलेल्या ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांचा ऑक्सिजन पुरवठा विस्कळीत झाल्याने 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ऑक्‍सिजनचा टँकर वेळेत न पोहोचल्याने ही दुर्दैवी घटना घडली आहे. तसेच या रुग्णालयात एकूण 100 रुग्णांवर उपचार सुरू होते. पण अचानक ऑक्सिजनचा पुरवठा विस्कळीत झाल्याने रुग्णांना श्वसनाचा त्रास होऊ लागला आणि रुग्णालयात एकच खळबळ माजली.

ऑक्सिजन टँकर येण्यास 5 मिनिटे उशीर झाल्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली. दरम्यान, सोमवारी रात्री 8 च्या दरम्यान रुग्णालयात घडलेल्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. संबंधित प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री वाय.एस जगनमोहन रेड्डी यांनी दिले आहेत. तसेच या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचंही त्यांनी बोलून दाखवलं.

सध्या रुईया रुग्णालयामध्ये ऑक्सिजन पुरवठा पूर्ववत करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. काही ठिकाणी रुग्णांना उपचार मिळत नसल्याने त्यांचा बळी जातोय तर काही ठिकाणी अशा अपघातामुळे रुग्णांचा नाहक बळी जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

थोडक्यात बातम्या –

दीड वर्षाच्या मुलीने आपल्या वडिलांच्या मांडीवर सोडला प्राण, नंतर वडिलांनी केलं अभिमानास्पद कृत्य…

‘या’ जिल्ह्यातील रुग्णालयांना महत्त्वपूर्ण आदेश; आता फक्त ‘या’ कारणासाठी रेमडेसिवीर इंजेक्शनचा वापर

‘संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा’; काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांंना पत्र

दिलासादायक! महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांसह मृतांच्या संख्येतही घट, जाणुन घ्या आकडेवारी

अबब… ‘या’ तरुणीला कोरोना लसीचे तब्बल 6 डोस एकाच वेळी दिले, त्यानंतर…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More